7th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात लवकरच बंपर वाढ होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार कर्मचाऱ्यांच्या पगारावर मोठा निर्णय घेऊ शकते, त्यानंतर पगारात थेट 95,000 रुपयांची वाढ होणार आहे. विशेष म्हणजे, कर्मचाऱ्यांच्या पगारातील ही वाढ एकरकमी असेल. यावेळी नवीन वर्षात कर्मचाऱ्यांना मोठी भेट देण्याचा सरकारचा विचार आहे.
बजेटमध्ये फिटमेंट फॅक्टरमध्ये सुधारणा केली जाऊ शकते
यासोबतच बातम्या येत आहेत की, या बजेटमध्ये सरकार (Government) फिटमेंट फॅक्टरमध्येही सुधारणा करु शकते. सध्या याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. सध्या कर्मचाऱ्यांना 2.57 नुसार फिटमेंट फॅक्टर मिळतो, तो 3.68 पर्यंत वाढवण्याची मागणी केली जात आहे. असे झाल्यास कर्मचाऱ्यांचे किमान वेतन थेट 18,000 रुपयांवरुन 26,000 रुपयांपर्यंत वाढेल.
गणना कशी केली जाईल?
गणनेबद्दल बोलताना, जर तुमचा किमान पगार 18,000 रुपये असेल, तर इतर सर्व प्रकारचे भत्ते वगळता, तुम्हाला 2.57 नुसार फिटमेंट फॅक्टर म्हणून 46260 रुपये मिळत आहेत. दुसरीकडे, जर सरकारने बजेटमध्ये वाढ केली तर ती 3.68 असू शकते, जी 26,000 रुपयांच्या मूळ वेतनावर मोजली जाईल.
खात्यात 95680 रुपये येतील
26,000 रुपये पगारानुसार फिटमेंट फॅक्टर 3.68 टक्के गृहित धरला तर कर्मचाऱ्यांना एकरकमी 95680 रुपये मिळतील. कर्मचार्यांच्या (Employees) पगारात बंपर वाढ होईल आणि एकाच वेळी खात्यात पैसे ट्रान्सफर करता येतील.
मागच्या वेळी पगार किती वाढला होता?
गेल्या वेळी केंद्र सरकारने फिटमेंट फॅक्टर वाढवल्यानंतर कर्मचाऱ्यांचे पगार तीन पटीने वाढले होते. कर्मचाऱ्यांचे पगार थेट 6000 वरुन 18000 पर्यंत वाढवले. यावेळी सरकारने कर्मचाऱ्यांची मागणी मान्य केल्यास पगार 18 हजारांवरुन 26 हजारांपर्यंत वाढणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.