7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले, 3 हप्त्यात मिळणार 2.18 लाख रुपये!

DA Arrears Latest News: नवीन वर्षात लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी येऊ शकते.
Money
MoneyDaINIK Gomantak
Published on
Updated on

DA Arrears Latest News: नवीन वर्षात लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी येऊ शकते. तुम्ही स्वतः किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीत असाल तर ही बातमी त्यांना आनंद देईल. महागाई भत्त्याची 18 महिन्यांची थकबाकी देण्याची मागणी केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र याबाबत एकमत होत नाही. आता नवीन वर्षाच्या निमित्ताने सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय येण्याची शक्यता आहे.

थकबाकीबाबत मागणी

यापूर्वी, कर्मचारी (Employees) आणि पेन्शनर्स युनियनच्या प्रतिनिधींनी 18 महिन्यांच्या महागाई भत्त्याच्या (डीए) थकबाकीच्या मागणीसंदर्भात कॅबिनेट सचिवांचीही भेट घेतली होती. मात्र, त्यादरम्यान थकबाकीबाबतची चर्चा कितपत पुढे सरकली याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर एकमत होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने महागाई भत्ता आणि कर्मचाऱ्यांची थकबाकी यावर चर्चा होणार आहे.

Money
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार बंपर वाढ, खात्यात येणार 95,000!

महागाई भत्ता 3 ते 4 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे

दरम्यान, अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या कर्मचारी संघटनांच्या मागणीवरही सरकारकडून सकारात्मक पावले उचलली जाऊ शकतात. याशिवाय जानेवारी 2023 चा भत्ताही 3 ते 4 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. या बैठकीत पीएम किसानचा 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यावरही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सरकारने (Government) यापूर्वी 18 महिन्यांच्या डीए थकबाकीसाठी नकार दिला होता. मात्र या चर्चेनंतर याबाबत एकमत होऊ शकते, अशी चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये आहे.

18 महिन्यांपासून डीए मिळालेला नाही

कोविड-19 महामारीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत DA मिळालेला नाही. या दीड वर्षात सरकारने डीएमध्ये 11 टक्के वाढ केली होती. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने कर्मचाऱ्यांचे पैसे रोखू नयेत, हे न्यायालयानेही मान्य केले आहे. हा त्यांचा हक्क आहे. थकबाकीच्या मागणीबाबत कर्मचाऱ्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. पेन्शनधारकांनी याबाबत पंतप्रधान मोदींकडे दादही मागितली होती.

Money
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात 'या' दिवशी येणार 2 लाख रुपये, DA थकबाकीची तारीख निश्चित!

DA थकबाकीसाठी किती पैसे?

जर सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे डीएचे थकीत पैसे देण्याचे मान्य केले तर त्यांच्या खात्यात मोठी रक्कम येणे अपेक्षित आहे. लेव्हल-3 मधील कर्मचाऱ्यांची डीए थकबाकी रुपये 11,880 ते रुपये 37,554 च्या दरम्यान असणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे, लेव्हल-13 किंवा लेव्हल-14 कर्मचार्‍यांची डीए थकबाकी रु. 1,44,200 ते रु. 2,18,200 पर्यंत असू शकते. मात्र, कर्मचारी संघटनांशी वाटाघाटी करुन रकमेबाबत मध्यममार्ग काढला जाऊ शकतो. डीएची थकबाकी एकाच वेळी देण्याऐवजी तीन हप्त्यांमध्ये दिली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com