September 1 Rule Change Dainik Gomantak
अर्थविश्व

September 1 Rule Change: 1 सप्टेंबरपासून देशात 7 मोठे बदल! एलपीजी, विमान प्रवास, बँक एफडी आणि कार खरेदीवर होणार थेट परिणाम

Rule changes from September 1 2026: सप्टेंबर महिना सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून, दर महिन्याच्या पहिल्या तारखेप्रमाणे 1 सप्टेंबरपासून देशात अनेक मोठे आर्थिक आणि प्रशासकीय बदल होणार आहेत.

Manish Jadhav

Rule changes from September 1 2026: सप्टेंबर महिना सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून, दर महिन्याच्या पहिल्या तारखेप्रमाणे 1 सप्टेंबरपासून देशात अनेक मोठे आर्थिक आणि प्रशासकीय बदल होणार आहेत. हे संभाव्य बदल थेट सर्वसामान्य नागरिकांचे बजेट, स्वयंपाकघर, बँकिंग व्यवस्था आणि विमान प्रवासावर परिणाम करणारे ठरणार आहेत. त्यामुळे 1 सप्टेंबरपूर्वी या बदलांची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.

सर्वप्रथम, परदेश प्रवास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी 1 सप्टेंबरपासून एक अत्यंत दिलासादायक नियम लागू होत आहे. आता प्रवाशांना विमानतळावरील इमिग्रेशन काउंटरवर लांबच लांब रांगेत उभे राहावे लागणार नाही. बोर्डिंग पासवर प्रत्यक्ष स्टॅम्प मारण्याची अट रद्द करण्यात आली असून, प्रवासी आपल्या मोबाईलमधील ई-बोर्डिंग पास किंवा त्याची हार्ड कॉपी दाखवून पुढे जाऊ शकतील. यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे.

दुसरीकडे, ऑईल मार्केटिंग कंपन्या 1 सप्टेंबर रोजी एलपीजी गॅस सिलेंडरच्या नव्या दरांची घोषणा करतील. गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडरचे दर कमी झाले होते, मात्र घरगुती गॅसचे दर स्थिर होते. तसेच, गॅस कनेक्शनची 'E-KYC' करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट आहे. जर 31 ऑगस्टपर्यंत ई-केवाईसी पूर्ण केली नाही, तर 1 सप्टेंबरपासून महागात गॅस सिलेंडर खरेदी करावा लागू शकतो. यासोबतच, हवाई इंधन (ATF), सीएनजी (CNG) आणि पीएनजी (PNG) चे दरही बदलण्याची शक्यता आहे, ज्यामुळे विमान प्रवास आणि वाहतूक महागू शकते.

वाहनांच्या बाबतीत, 1 सप्टेंबरपासून टाटा मोटर्स आपल्या सर्व गाड्यांच्या आणि एसयूव्हीच्या (SUV) किमती 25000 रुपयांपर्यंत वाढवणार आहे. हे नवीन दर पेट्रोल-डिझेलसह ईव्ही (EV) मॉडेल्सवरही लागू होतील. टाटाव्यतिरिक्त ह्युंदाई मोटर इंडियानेही कारचे दर वाढवण्याचे संकेत दिले आहेत.

बँकिंग क्षेत्रातही 1 सप्टेंबरपासून मुदत ठेव म्हणजेच एफडीच्या (FD) व्याजदरांमध्ये फेरबदल होऊ शकतात. व्याजदर वाढल्यास गुंतवणूकदारांना फायदा होईल, तर दर घटल्यास परतावा कमी मिळू शकतो. तसेच, एटीएममधून मर्यादा ओलांडून व्यवहार केल्यास लागणाऱ्या शुल्कातही (ATM Transaction Charges) बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 1 सप्टेंबरनंतरच नवीन एफडी किंवा महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election: 'मगो'च्या सर्वेक्षणावर भाजपचे मौन! फोंड्यानंतर साखळीसह 12 मतदारसंघांवर दावा

iPhone 18 Pro कधी होणार लॉन्च? Appleने दिली अधिकृत तारीख; कंपनीकडून पहिला Foldable फोन पाहायला मिळणार? उत्सुकता वाढली

खरी कुजबुज: राजकीय पक्षांतील चढाओढ

Goa Police Torture: 5 तरुणांना बेकायदा कोठडी, अमानुष मारहाण अन्.. 'मानवाधिकार'ची खाकीला चपराक; पीडितांना प्रत्येकी 20 हजारांची भरपाई देण्याची शिफारस

Zodiac Personality Traits: जिद्दीच्या बाबतीत नंबर-1! स्वतःचे मत सहजासहजी न बदलणाऱ्या 3 बलवान राशी; वादविवाद अजिबात करु नका

SCROLL FOR NEXT