Paytm Offer Dainik Gomantak
अर्थविश्व

Paytmच्या UPI पेमेंटवर मिळवा 100 रुपायांचा कॅशबॅक; असे करा रजिस्टर्ड

पेटीएमच्या UPI पेमेंटवर 100 रुपायांचा कॅशबॅक मिळविण्याची पध्दत तुम्हाला माहितीये का?

दैनिक गोमन्तक

Paytm ने आज आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर जाहीर केली आहेत. युजर्स 6 ते 20 फेब्रुवारी 2022 दरम्यान पेटीएम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज ODI आणि T20 सामन्यांमध्ये UPI मनी ट्रान्सफरवर कॅशबॅक आणि इतर रिवॉर्ड जिंकू शकतात. सामन्याच्या दिवशी, नवीन युजर्स '100 पैकी 4 कॅशबॅक ऑफर' (4 ka 100 cashback) चा लाभ घेऊ शकतात. ज्यामध्ये त्यांना Paytm UPI द्वारे मनी ट्रान्सफरसाठी कॅशबॅक मिळेल. नवीन युजर्स मनी ट्रान्सफरवर या 100 पैकी 4 ऑफरचा लाभ घेऊ शकतील.

याशिवाय, रेफरल प्रोग्राममध्ये सहभागी होऊन अतिरिक्त कॅशबॅक देखील जिंकू शकतात. जेव्हा एखादा युजर्स मित्र किंवा आपल्या फॅमिलीला UPI मनी ट्रान्सफरसाठी Paytm वापरण्यासाठी इनव्हाइट करतो, तेव्हा रेफरर आणि रेफरी दोघेही 100 कॅशबॅक मिळवू शकतात. ऑफरला प्रोत्साहन देण्यासाठी पेटीएमने भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल, हरभजन सिंग आणि वेस्ट इंडिजचा खेळाडू ख्रिस गेल यांच्यासोबत ऑनलाइन मोहीम सुरू केली.

कसे करायचे रजिस्टर्ड

पेटीएम अॅप वापरून काही मिनिटांत पेटीएम UPI साठी नोंदणी करता येते. हे युजर्सना त्यांच्या बँक खात्यातून अखंड आणि सुरक्षित ऑनलाइन पेमेंट करण्यास मदत करते. यामुळे त्यांना लिंक केलेल्या खात्यातील शिल्लक त्वरित तपासता येते आणि कोणताही UPI QR कोड स्कॅन करून पेमेंट करता येते.

डिसेंबर 2021 मध्ये 926 दशलक्ष व्यवहारांची नोंद

UPI इकोसिस्टममध्ये, पेटीएम पेमेंट्स बँक ही UPI व्यवहारांसाठी सर्वात मोठी लाभार्थी बँक आहे, NPCI डेटानुसार डिसेंबर 2021 मध्ये विक्रमी 926 दशलक्ष व्यवहारांसह आणि UPI व्यवहारांसाठी अग्रगण्य रेमिटन्स बँकांपैकी एक आहे. बँकेच्या मजबूत तंत्रज्ञानामुळे ते भारतातील सर्वात कमी नुकसानासह अखंड, सुरक्षित आणि सुपरफास्ट UPI मनी ट्रान्सफर ऑफर करण्यास तयार झाले आहे. पेटीएम यूपीआय सुपरफास्ट आणि सुरक्षित मनी ट्रान्सफर देते, ज्यामुळे लाखो वापरकर्त्यांना सुविधा मिळते, असे पेटीएमचे उपाध्यक्ष नरेंद्र यादव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indigo Flights: मोपा विमानतळावर 8 तर दाबोळीत 9 विमाने रद्द; इंडिगोच्या गोंधळामुळे मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांचे प्रवास ठप्प

Goa Nightclub Fire: नाईट क्लब दुर्घटना प्रकरणात 'पाचवी' अटक, भरत कोहलीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; मालकाचा शोध सुरु

रो दे, रो दे... विराट कोहलीने कुलदीप यादवची उडवली खिल्ली, ड्रेसिंग रूममधील Video Viral

Goa Live News: भाजप उमेदवार रघुवीर कुंकळकर यांनी उमेदवारी अर्ज भरला; मंत्री बाबूश मॉन्सेरात यांची खास उपस्थिती

Crime News: निर्वस्त्र, सडलेल्या अवस्थेत आढळला 20 वर्षीय तरूणीचा मृतदेह; बलात्कार करून हत्या केल्याचा संशय

SCROLL FOR NEXT