अर्थविश्व

Bajaj CT 125X: बजाजची 125 सीसी सर्वात स्वस्त बाईक लॉन्च, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

गोमन्तक डिजिटल टीम

बजाज कंपनीची नवी बाईक लॉन्च झाली असून, 125 सीसी श्रेणीतील हाी सर्वात स्वस्त बाईक असल्याचे बोललले जात आहे. तीन वेगवेगळ्या रंगात उपलब्ध असलेली ही बाईक अधिकच आकर्षक आणि पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहे. सध्या डिस्कव्हरचे 125 सीसी मॉडेल बाजारातून हटविण्यात आले आहे. त्यामुळे नव्यानं आलेल्या Bajaj CT 125X ची ग्राहक आतुरतेने वाट पाहत होते. तेव्हा जाणून घेऊयात काय आहेत बाईकची फिचर्स आणि किंमत. (2022 Bajaj CT 125X launched in India: Priced from Rs. 71,354)

फिचर्स

बजाजच्या या बाईकमध्ये 4 स्ट्रोक, एअर कूल्ड सिंगल सिलेंडरसह 124.4 सीसी इंजिन आहे. इंजिन जास्तीत जास्त 8000 rpm सह 10.9 Ps ची पॉवर आणि 5500 rpm सह 11 Nm टॉर्क जनरेट करू शकते.

बाईकमध्ये रेग्युलर इंधन-इंजेक्शन प्रणाली ऐवजी, आता इंटिलिजन्ट कार्बोरेटर आहे.

बाईकमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स आहे.

यूएसबी फीचर आहे.

अॅनालॉग स्पीडोमीटर.

ट्यूबलेस टायर.

राउंडर हेडलॅम्प, एलईडी डीआरएल, रबर टँक पॅड, मोठा ग्रॅब रेल, छोटा व्हिझर, मेटल गार्ड, फ्रंट टेलिस्कोपिक सस्पेन्शन, ट्विन शॉक ऑब्झर्व्हर्स, सिंगल सीट सेटअप, लगेज रॅक आणि साइड क्रॅश गार्ड आहेत.

किंमत

बजाज CT 125X ही 125 सीसी श्रेणीतील सर्वात स्वस्त बाइक आहे. बाईकची किंमत 71,354 रुपये (दिल्ली, एक्स-शोरूम किंमत) ठेवण्यात आली आहे. बजाज CT 125X बाईकची 125cc श्रेणीतील TVS Raider 125, Honda SP125, Hero Super Splendor आणि Hero Glamour या बाईक सोबत स्पर्धा असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT