गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर डिचोलीतील वाहतूकीत बदल

वाढत्या वाहनांचा विचार करत डिचोली पालिकेने केले बदल
Bicholim News
Bicholim News Dainik Gomantak

गणेश चतुर्थीच्या काळात वाढू शकणाऱ्या वाहनांची संख्या तसेच नागरिकांकडून खरेदीसाठी गर्दी होण्याची संभाव्यता पाहता याचा विचार करत डिचोली येथील वाहतूकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. अशी माहिती डिचोली पालिकेने दिली आहे.

(Change in traffic at Bicholim Ahead Of Ganesh Chaturthi)

Bicholim News
Ganesh Chaturthi 2022: जाणून घ्या, गोव्यातील गणेश स्थापनेसाठी तारीख, वेळ, कथा आणि शुभ मुहूर्त

मिळालेल्या माहितीनुसार डिचोली नगर पालिकेने गणेश चतुर्थीच्या काळात सकाळी सात ते रात्री दहा या काळात वाहतूकीत बदल करण्यात येणार आहेत. यानुसार डिचोली मार्केटमध्ये वाहनांना ‘नो एंट्री’ असणार आहे. कारण या काळात मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी बाहेर पडणार आहेत. त्यामूळे सर्व नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला असून नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे ही प्रशासनाने म्हटले आहे.

Bicholim News
Madgaon : लिंडन परेरा यांचा मडगावच्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा

येत्या रविवारपासून ते गणेश चतुर्थीपर्यंत हा वाहनांसाठीचा बदल केला जाणार आहे. अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. हा बदल सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत कोणत्याही वाहनांना बाजारात परवानगी दिली जाणार नाही. बाजाराकडे जाणारे सर्व रस्ते बंद राहतील अशी ही माहिती नगरपालिकेने वाहतूक पोलिसांना ही कळवली आहे. त्यामूळे पोलीस ही या बदलाने आपले नियोजन त्याप्रमाणे आखणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com