PM Kisan Samman Nidhi Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: होळीपूर्वी शेतकऱ्यांचे बल्ले-बल्ले, सरकारने केली अशी घोषणा, ऐकून व्हाल आनंदी!

PM Kisan Scheme Update: मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीएम मोदी हे पैसे 24 फेब्रुवारीला ट्रान्सफर करु शकतात. आतापर्यंत 12 हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.

Manish Jadhav

PM Kisan 13th Installment: देशभरातील 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे (PM Kisan Yojana News). जर तुम्हीही प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या (PM Kisan 13th Installment Date) 13व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर आता अवघ्या 2 दिवसांनी करोडो शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे येणार आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीएम मोदी हे पैसे 24 फेब्रुवारीला ट्रान्सफर करु शकतात. आतापर्यंत 12 हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.

योजनेला 4 वर्षे पूर्ण

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 24 फेब्रुवारीला योजनेला 4 वर्षे पूर्ण होत आहेत, त्यामुळे या दिवशी सरकार शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात पैसे टाकू शकते, असे मानले जात आहे. तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर त्याचे सर्व तपशील तपासू शकता.

या योजनेत 12 कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे

माहिती देताना केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले होते की, 2022 मध्ये पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 10.45 कोटी होती. त्याचवेळी, सुमारे 12 कोटी शेतकरी पीएम किसान (PM Kisan) योजनेचा लाभ घेत आहेत.

eKYC आवश्यक आहे

ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेले नाही त्यांच्या खात्यावर पैसे हस्तांतरित केले जाणार नाहीत, असे सरकारने म्हटले आहे. त्यामुळे जर तुम्ही ते अजून पूर्ण केले नसेल... तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत.

ई-केवायसी कसे केले जाऊ शकते?

>> पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.

>> वेबसाइटच्या उजव्या बाजूला असलेल्या e-KYC च्या पर्यायावर क्लिक करा.

>> आता तुमचा आधार क्रमांक टाका.

>> यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल, तो टाका.

>> यानंतर 'Submit' वर क्लिक करा.

>> आता तुमचे ई-केवायसी पूर्ण होईल.

ऑक्टोबरमध्ये 12 वा हप्ता जारी करण्यात आला

PM मोदींनी 17 ऑक्टोबर 2022 रोजी 12 व्या हप्त्यासाठी पैसे हस्तांतरित केले. आतापर्यंत सुमारे 80 दशलक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर 16,000 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. हे पैसे तीन हप्त्यांमध्ये दिले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'देवाची शपथ घेऊनसुद्धा काँग्रेसचे आमदार भाजपसोबत गेल्याचा इतिहास'! आतिषी यांची सडेतोड मुलाखत; Watch Video

Diwali 2025: दिवाळी तोंडावर तरी दुकानदार, विक्रेते चिंतेत! ‘ऑनलाईन’ खरेदीचा फटका; घोंगावतेय पावसाचे सावट

Goa Live News: पंचांना अपात्र ठरवण्याचा आदेश रद्द!

Ramsetu: भुईपालचे विद्यार्थी करणार ‘रामसेतू’वर संशोधन! 43 शिक्षक, विद्यार्थी ‘धनुषकोडी’कडे रवाना; प्रशिक्षण यात्रांतर्गत उपक्रम

Goa Weather: 'काळजी घ्या'! पारा पोचला 34.8 अंशांवर; उकाड्याने नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT