PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' दिवशी खात्यात पैसे होणार जमा

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता या महिन्यात बळीराजाच्या खात्यात जमा होणार.
PM Kisan Scheme
PM Kisan Scheme Dainik Gomantak

PM Kisan Samman Nidhi: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे. योजनेतंर्गत तेरावा हप्ता 27 फेब्रुवारी रोजी खात्यात जमा होणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. या योजनेचा लाभ

केवळ आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होईल. आधार सीडिंग प्रलंबित लाभार्थ्यांनी बँकेत जाऊन आधार सीडिंग ई-केवायसी करुन घ्यावे, त्यासाठी महा-ई-सेवा केंद्र चालकांची मदत घ्यावी अथवा बँक खाते आयपीपीबीमध्ये भारतीय डाक विभागामार्फत उघडण्यात यावेत.

ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी (EKYC) झालेले नाही, त्या शेतकऱ्यांनी आपल्या बँकेत जाऊन ई केवायसी करुन घ्यावे.

त्यासाठी महा ई-सेवा केंद्र चालकांची मदत घ्यावी किंवा त्या शेतकऱ्यांनी बँक खाती इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये उघडावीत, असे आवाहन कोल्हापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा पीएम किसान योजनेचे नोडल अधिकारी भगवान कांबळे यांनी केले आहे.

लाभार्थ्यांची बँक खाती आयपीपीबीमध्ये नव्याने उघडल्यानंतर पुढील 48 तासांमध्ये ती आधार संलग्न होऊन सक्रिय होतील, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

सर्व प्रयत्न करुनही ई-केवायसी होत नसेल तरच पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थांनी बँक खाती (Bank Account) आयपीपीबीमध्ये (Indian Post Payment Bank) उघडण्यात यावीत म्हणजे कोणताही लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असेही जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

पीएम किसान योजना ही एक केंद्रीय योजना आहे, जी देशातील सर्व भूमीधारक शेतकऱ्यांना कृषी आणि संबंधित कामासाठी तसेच घरगुती आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्य करते. शेतकर्‍यांना सन्माननीय जीवनासाठी मदत म्हणून ही योजना सुरु झाली.या योजनेच्या लाभार्थ्यांचे संपूर्ण आर्थिक दायित्व केंद्र सरकार उचलते.

PM Kisan Scheme
Goa Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या किमतीला ब्रेक,गोव्यातील आजचे पेट्रोल-डिझेलचे भाव जाणून घ्या
  • आपला स्टेटस कसा चेक कराल?

pmkisan.gov.in या वेब साइडवर जावे.

होमपेजवरील 'Farmers Corner' सेक्शन विभागांतर्गत 'Beneficiary Status' ऑप्शन निवडावा.

नोंदणीकृत आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकावा.

'डेटा मिळवा' वर क्लिक करा.

हप्त्याची स्थिती कळेल.

  • या लोकांनी लाभ मिळणार नाही

ज्या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांचे EKYC पूर्ण केले नाही त्यांना तेराव्या हप्त्याची रक्कम मिळणार नाही. पीएम किसान वेबसाईटनुसार, पीएम किसानमध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे.OTP आधारित eKYC PMKisan पोर्टलवर उपलब्ध आहे. बायोमेट्रिक आधारित eKYC साठी जवळच्याCSC केंद्रांशी संपर्क साधता येईल. eKYC ची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com