Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Dainik Gomantak
अर्थविश्व

राज्य सरकारच्या मंजुरीमुळे रखडला पंतप्रधान किसान योजनेचा 11 वा हप्ता

मोदी सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 11 वा हप्ता हस्तांतरित करण्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

दैनिक गोमन्तक

मोदी सरकारकडून (Modi Government) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) 11 वा हप्ता हस्तांतरित करण्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 15 एप्रिलपूर्वी हप्ता जाहीर करण्याची घोषणा केली जाऊ शकते. (11th instalment of PM Kisan Yojana stalled due to state government)

एप्रिल-जुलै 2022 चा हप्ता मिळणार की नाही? कारण पंतप्रधान किसान सन्मान निधीचा हप्ता मिळण्यासाठी लाभार्थ्याचे आधार आधारित ई-केवायसी आवश्यक असणार आहे. पंतप्रधान किसान पोर्टलवरून सध्या ई-केवायसी बंद असून, ते सुरु करण्याची शेवटची तारीख 31 मे असणार आहे.

आपला हप्ता येणार की नाही, यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या पीएम किसान खात्याची सर्व स्थिती तपासावी लागेल जेणे करुन तुम्हाला हत्या संदर्भात माहिती मिळेल. त्यासाठी आपल्या मोबाईल किंवा कम्प्युटरवर या स्टेप्स फॉलो करा...

स्टेप-1: सर्वप्रथम पंतप्रधान किसान https://pmkisan.gov.in/ अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या, येथे तुम्हाला उजव्या बाजूला 'फार्मर्स कॉर्नर'चा पर्याय दिसेल.

स्टेप-2 : येथे 'बेनिफिशियरी स्टेटस' या पर्यायावर क्लिक करून, येथे एक नवीन पेज उघडेल.

स्टेप-3: नवीन पेजवर आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक यातील एक पर्याय निवडून घ्या. या तीन नंबरच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे सहजरित्या तपासू शकता.

स्टेप-4: तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा नंबर तिथे भरा. त्यानंतर 'गेट डेटा'वर क्लिक करा.

स्टेप-5: येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व व्यवहाराची माहिती मिळून जाईल. म्हणजेच तुमच्या खात्यात हप्ता कधी आला आणि कोणत्या बँक खात्यात पतपुरवठा झाला? या वेळी, आपल्याला आपल्या स्थितीतील पुढील हप्त्याबद्दल राज्याद्वारे मंजुरीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

राज्याकडून मंजुरीची वाट पाहणे म्हणजे काय?

जर पंतप्रधान किसान सन्मान निधी पोर्टलवर आपली स्थिती तपासत असतील आणि आपल्या पुढील हप्त्यासाठी राज्याकडून मंजुरीची प्रतीक्षा करत असतील तर 2000 रुपयांची रक्कम मिळण्यास थोडा उशीर होत आहे हे आपण समजून घ्या.आणि राज्य सरकारने अद्याप मान्यता दिलेली नाही. राज्य सरकारने (State Government) आपण दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी करताच आरएफटीवर स्वाक्षरी करून ती केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT