SGPDA मासळी मार्केटचे लवकरच उदघाटन! पे पार्किंग तसेच सोपो कर वाढीला मान्यता; निविदेसाठी 3 कोटी बोली रक्कम

SGPDA Meet: एसजीपीडीएच्या किरकोळ मार्केटमधील विक्रेते सोपो म्हणून केवळ दिवसा १० रुपये प्रत्येक चौरस मिटर जागेसाठी देतात. एवढ्या रकमेत मार्केटची देखभाल होत नाही.

SGPDAMeet

सासष्टी: एसजीपीडीए घाऊक मासळी मार्केट इमारतीचे दोन तृतीयांश काम पूर्ण झाले असून पुढील १५ दिवसांत या इमारतीचे उद्‍घाटन केले जाईल, अशी माहिती एसजीपीडीएचे चेअरमन तथा वास्कोचे आमदार कृष्णा ऊर्फ दाजी साळकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली.

तसेच सोपो गोळा करण्याचे कंत्राट ३१ जानेवारीपर्यंत दिले जाईल. यापूर्वी जाहीर केलेल्या निविदेत काही त्रुटी होत्या, त्या सरकारकडून दुरुस्त केल्या आहेत. त्या निविदेची बोली 4 कोटी होती, आता निविदेची बोली ३ कोटी ठरवण्यात आली आहे. पुढील १५ दिवसांत निविदा जाहीर केली जाईल.

ढवळी, फोंडा इथे एसजीपीडीएचे ३६ भूखंड आहेत. या भूखंडाचा लिलाव करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात १५ ते २० भूखंडाचा लिलाव केला जाईल, अशी माहिती साळकर यांनी दिली.

आयनॉक्स समोरील एसजीपीडीएच्या जागेत वाहने पार्क केली जातात मात्र शुल्क आकारण्यात येत नाही. आता या ठिकाणी एका तासाला १० रुपये व संपूर्ण दिवस वाहन पार्क केल्यास ५० रुपये आकारण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे.

एसजीपीडीएच्या किरकोळ मार्केटमधील विक्रेते सोपो म्हणून केवळ दिवसा १० रुपये प्रत्येक चौरस मिटर जागेसाठी देतात. एवढ्या रकमेत मार्केटची देखभाल होत नाही. त्यामुळे यात वाढ करण्यासाठी विक्रेत्यांकडे चर्चा करून शुल्क निश्र्चित केले आहे. शुल्क वाढीची ही फाइल मान्यतेसाठी सरकारकडे पाठवली आहे, अशी माहिती साळकर यांनी दिली.

या बैठकीला मडगावचे आमदार दिगंबर कामत, फातोर्डेचे आमदार विजय सरदेसाई, इतर सदस्य व अधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com