Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Goa Forward Party's Gherao of University Chancellor : गोवा विद्यापीठात स्थानिकांना डावलण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न होत असल्याचा आरोप गेली काही वर्षे केला जात आहे. स्थानिक भाषेची जाण व पंधरा वर्षांचा रहिवासी दाखला या दोन अटी शिथिल करून परप्रांतीय उमेदवारांसाठी विद्यापीठाचे दरवाजे उघडे केले जात असल्याचा हा आरोप आहे व आज तो खरा ठरला.

Goa Forward Leaders At Goa University

पणजी: गोवा विद्यापीठात स्थानिकांना डावलण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न होत असल्याचा आरोप गेली काही वर्षे केला जात आहे. स्थानिक भाषेची जाण व पंधरा वर्षांचा रहिवासी दाखला या दोन अटी शिथिल करून परप्रांतीय उमेदवारांसाठी विद्यापीठाचे दरवाजे उघडे केले जात असल्याचा हा आरोप आहे व आज तो खरा ठरला. पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हा आरोप केल्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘‘सरकार स्थानिकांच्या हक्काचे रक्षण करेल’’ असे आश्वासन दिले होते. मात्र तरीही विद्यापीठाकडून पुन्हा तोच प्रकार घडल्याचे आज उघड झाले.

त्‍या मुलाखतींचे काय झाले?

स्कूल ऑफ अर्थ ओशन ॲण्ड ॲटमोस्पेरिक सायन्स अध्ययन शाखेत प्राध्यापकांच्या भरतीसाठी २३ ऑगस्ट २०२३ रोजी पहिल्यांदा जाहिरात काढण्यात आली. त्यावेळी एक ओबीसी आणि एक सर्वसाधारण पदासाठी असे दोन अर्ज मागविण्यात आले. त्यानंतर २१ डिसेंबर २०२३ रोजी याच विभागात चार प्राध्यापकांच्या पदांसाठी गोव्यातील पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्‍या होत्‍या.

अन् कुलगुरूंची माघार

शेवटच्या क्षणी अधिसूचना काढून उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावणे योग्य नसल्याचे प्रशांत नाईक यांनी कुलगुरूंना प्रो. हरिलाल मेनन यांना सुनावले. त्‍यानंतर कुलगुरूंनी नमते घेत, उद्याच्‍या मुलाखती घेतल्या जाणार नाहीत. तसेच सोमवारी या शिष्‍टमंडळाशी चर्चा करणार असल्‍याचे सांगितले.

आता नेमके काय घडले?

गोवा विद्यापीठातील स्कूल ऑफ अर्थ ओशन ॲण्ड ॲटमोस्पेरिक सायन्स अध्ययन शाखेत प्राध्यापकांच्या भरतीसाठी दोनवेळा परिपरत्र काढण्यात आले. पात्र गोमंतकीय उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. असे असताना पुन्हा अधिसूचना काढून नव्याने मुलाखती घेण्याचे ठरविण्यात आले.

या मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांकरिता गोव्‍यातील पंधरा वर्षांचा रहिवासी दाखला व राजभाषा कोकणीची अनिवार्यता, ही अट शिथिल केली असल्याने गोवा फॉरवर्डच्या पदाधिकाऱ्यांनी गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. हरिलाल मेनन यांना घेराव घालून जाब विचारला.

त्‍यामुळे कुलगुरू प्रा. मेनन यांनी उद्या घेण्यात येणाऱ्या मुलाखती रद्द करत याबाबत सोमवारी गोवा फॉरवर्डच्या शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे आश्‍वासन दिले, असे गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस प्रशांत नाईक यांनी सांगितले.

घेरावानंतर विद्यापीठ आवारात ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दिलीप प्रभुदेसाई, दीपक कळंगुटकर, संतोष सावंत, श्रीकृष्ण हळदणकर, फ्रेडी त्रावासो, कादर शहा, इतर पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com