Devendra Fadnavis: जम्मू-काश्मीरमध्ये राज्यघटनेबाबत काँग्रेसचा दुटप्पीपणा उघड; फडणवीसांचं गोव्यातून शरसंधान

Goa BJP: जुने गोवे बगल रस्त्यालगत बांधण्यात येणाऱ्या गोवा भाजप मुख्यालयाच्या नव्या सुसज्ज इमारतीचा कोनशिला समारंभ काल (24 ऑगस्ट) संपन्न झाला.

जुने गोवे बगल रस्त्यालगत बांधण्यात येणाऱ्या गोवा भाजप मुख्यालयाच्या नव्या सुसज्ज इमारतीचा कोनशिला समारंभ काल (24 ऑगस्ट) संपन्न झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. यावेळी भाषणाच्या माध्यमातून फडणवीसांनी कॉंग्रेस शरसंधान साधले. फडणवीस म्हणाले की, ''राज्यघटनेच्या रक्षणाचा आव आणणारा कॉंग्रेस पक्ष प्रत्यक्षात फुटीरतावाद्यांसोबत मांडवली करत आहे. त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्ससोबत युती करुन आपली भूमिका उघड केली आहे. आजवर 370 कलमामुळे तिथे अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीयांना आरक्षण मिळत नव्हते. भाजपने ते कलमच राज्यघटनेतून हटवल्याने आरक्षण मिळू लागले.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com