Mrs World 2022: तब्बल 21 वर्षानंतर भारतीय सुंदरीला 'मिसेस वर्ल्ड 2022'चा किताब

2001 मध्ये आदिती गोवित्रीकरने मिळवला होता सन्मान
Mrs World 2022
Mrs World 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

Mrs. World 2022: भारतातील एका महिलेने पुन्हा जगात भारताची मान उंचावली आहे. जम्मू-काश्मीरची रहिवासी असलेल्या सरगम कौशलने (Sargam Koushal) मिसेस वर्ल्ड 2022 किताब पटकावला आहे. या किताबामुळे 21 वर्षांनी भारत पुन्हा या किताबाचा मानकरी ठरला आहे. अमेरिकेच्या माजी मिसेस वर्ल्ड शायलिन फोर्ड यांनी हा मानाचा मुकूट सरगम ​​कौशल हिच्या शिरावर चढवला.

सरगम ही मिसेस इंडिया वर्ल्ड 2022 ची विजेती ठरली होती. त्यानंतर तिने जागतिक किताबही स्वतःच्या नावे केला आहे. द ग्रेट पीजेंट कम्युनिटी पेजने याबाबतची माहिती शेअर करत भारताचे अभिनंदन केले आहे.

Mrs World 2022
Delhi : दिल्लीत भरधाव कारचा थरार; फूटपाथवर उभ्या तीन शाळकरी मुलांना चिरडले; व्हिडीओ व्हायरल

सरगम ​​कौशलने म्हटले आहे की, 'आम्हाला (भारताला) 21-22 वर्षांनी हा मुकुट परत मिळाला आहे. मला याचा खूप आनंद आहे. लव्ह यु इंडिया. लव्ह यू वर्ल्ड. दरम्यान, यापुर्वी 2001 मध्ये हा किताब भारताच्या आदिती गोवित्रीकरने पटकावला होता. 2022 च्या स्पर्धेत मिसेस पोलिनेशिया उपविजेती ठरली तर मिसेस कॅनडाला सेकंड रनरअप म्हणून घोषित केले गेले.

कोण आहे सरगम कौशल?

सरगम कौशल मूळची जम्मू काश्मिरमधील असून ती शिक्षिका आहे. सोबतच ती मॉडेलिंग देखील करते. सरगमने 2018 सालात लग्न केले होते. पतीने दिलेल्या प्रोत्साहनानंतर तिने सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

Mrs World 2022
Bilawal Bhutto: आम्ही मोदी, RSS ला घाबरत नाही; भुट्टो पुन्हा बरळले...

ज्युरी पॅनेलमध्ये भारतीय सेलिब्रिटींचा समावेश

या आंतरराष्ट्रीय पीजंट शोमध्ये बॉलीवुडचे अनेक सेलिब्रिटी ज्युरी म्हणून उपस्थित होते. यात अभिनेत्री सोहा अली खान, अभिनेता विवेक ओबेरॉय, माजी क्रिकेटपटू मोहम्मद अजहरुद्दीन, सुप्रसिद्ध डिझायनर मौसमी मेवावाला आणि भारताची माजी मिसेस वर्ल्ड आदिती गोवित्रीकर यांचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com