Ashiqui 3 Updates : आशिकी...तोच चित्रपट ज्याच्या कथेने आणि संगीताने 90 च्या दशकावर आपले नाव कायमचे कोरले होते. अभिनेता राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांचा 'आशिकी' हा पहिलाच चित्रपट.
'आशिकी' हा ब्लॉकबस्टर चित्रपट 1990 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या रिलीजला आज सुमारे 33 वर्षे पूर्ण झाली. महेश भट्ट यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने त्याच वर्षी रिलीज झालेल्या 'हम' या अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाला मागे टाकले होते.
2013 मध्ये मोहित सूरी दिग्दर्शित 'आशिकी 2' रिलीज झाला. प्रेक्षकांनाही हा चित्रपट खूप आवडला. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूरची जोडी प्रेक्षकांनी मनापासुन स्वीकारली होती.
मिळालेल्या माहितीनुसार सध्य 'आशिकी 3'ची तयारी सुरू आहे. आशिकी 3 साठी कार्तिक आर्यनला आधीच फायनल करण्यात आले आहे.
गेल्या काही काळापासून चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्रीचाही शोधही सुरू होता. नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार हा शोध आता पूर्ण झाला आहे. कार्तिक पडद्यावर साऊथच्या एका अभिनेत्रीसोबत रोमान्स करणार असल्याची बातमी आहे.
निर्मात्यांनी आधीच स्पष्ट केले होते की 'आशिकी 3' मध्ये एक नवीन चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळेल, या चित्रपटासाठी नवीन अभिनेत्रीचा शोध सुरू होता. आता या चित्रपटासाठी साऊथ अभिनेत्री आकांक्षा शर्माचे नाव फायनल झाल्याचे बोलले जात आहे.
थोडक्यात अनु अग्रवाल आणि श्रद्धा कपूरनंतर आता आकांक्षा या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमीकेत दिसणार आहे.
तसे, आकांक्षा शर्मा ही साऊथची अभिनेत्री आहे. तिने प्रामुख्याने कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का की ती टायगर श्रॉफसोबत म्युझिक व्हिडिओंमध्ये देखील दिसली आहे.
अभिनेत्री आकांक्षा शर्मा 'कसानोव्हा' आणि 'डिस्को डान्सर 2.0' या हिंदी म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होता. बादशाहच्या 'जुगनू' गाण्यातही ती आहे. आकांक्षाने 2022 मध्ये त्रिविक्रम या चित्रपटातून पदार्पण केले. अनेक जाहिरातींमध्येही ती दिसली आहे. आकांक्षाचा जन्म हरियाणात झाला तर तिनं मुंबईत शिक्षण घेतले.
कार्तिक आर्यनच्या इतर चित्रपटांबद्दल बोलायचे तर तो 'सत्यप्रेम की कथा'मध्ये कियारा अडवाणीसोबत दिसला होता. त्याच्याकडे 'चंदू चॅम्पियन' देखील आहे, जो 2024 मध्ये रिलीज होणार आहे.
'सत्य प्रेम की कथा' हा त्याचा चित्रपट काही विशेष कमाल दाखवू शकला नसला तरी त्याच्या आगामी आशिकी 3 कडून त्याच्या चाहत्यांना मनोरंजनाची आशा बाळगायला हरकत नाही.