Vicky Kaushal With Bear Grylls: विकीचे 'कौशल्य' लागणार पणाला, बेअर ग्रिल्ससोबत करतोय धोकादायक स्टंट

विकी कौशल बेअर ग्रिल्सच्या 'इन द टू वाईल्ड' या साहसी रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावणार आहे.
Vicky Kaushal
Vicky KaushalDainik Gomantak

कतरिना कैफ सोबत नुकतेच लग्न बंधनात अडकलेल्या बॉलिवूड स्टार विकी कौशल पुन्हा सिनेसृष्टीत सक्रिय झाला आहे. विकी कौशल बेअर ग्रिल्सच्या 'इन द टू वाईल्ड' या साहसी रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावणार आहे. यामध्ये विकी बेअर सोबत धक्कादायक स्टंट करताना दिसत असून, विकीचे कौशल्य पणाला लागले आहे.

Vicky Kaushal
Gavpalan Tradition Of Chindar: घर, ग्रामपंचायत बंद करून गाव जातं पळून, काय आहे 'गावपळण' प्रथा?

डिस्कव्हरी चॅनलने विकी कौशल आणि बेअर ग्रिल्स सोबत केलेल्या शोचा प्रोमो नुकताच प्रसिद्ध केला आहे. या प्रोमोत विकी कौशल खोल पाण्याखाली पोहताना दिसत आहे. विकीच्या भोवती पाण्याखाली मोठे शार्क आणि इतर मासे देखील दिसत आहेत. विकी सोबत पाण्याखाली बेअर ग्रिल्स देखील आहे. शो दरम्यानचा अनुभव धक्कादायक असल्याचे विकी कौशलने म्हटले आहे.

Vicky Kaushal
Congress Vs MNS: सावरकर वाद! मनसेच्या दादागिरी विरोधात काँग्रेसची गांधीगिरी

"या शोमुळे मला माझ्या भीतीचा सामना करण्याची संधी मिळाली. या शोमध्ये अनेक चित्तथरारक गोष्टी करता आल्या. समुद्राच्या मध्यभागी पोहण्याची मला भिती वाटत होती, त्यामुळे माझ्यासाठी हा अनुभव खूप वेगळा होता."

विकीचा हा एपिसोड तुम्ही सोमवार, 21 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता डिस्कव्हरी चॅनल इंडियावर पाहू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com