Congress Vs MNS: सावरकर वाद! मनसेच्या दादागिरी विरोधात काँग्रेसची गांधीगिरी

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या टीकेचे महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी समर्थन केले आहे.
Congress Vs MNS
Congress Vs MNSDainik Gomantak

राहूल गांधी यांनी सावरकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. राहूल गांधी (Rahul Gandhi) यांची बुलढाणा येथील शेगाव येथे आज (दि.18) भारत जोडो यात्रेची (Bharat Jodo Yatra) सभा होणार आहे. या सभेला काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा मनसेने दिला आहे. यासाठी मनसेचे नेते संदीप देशपांडे, अविनाश जाधव यासह इतर पदाधिकारी शेगावला रवाना झाले आहेत. तर, अकोल्यात शेगावाकडे जाणाऱ्या मनसेच्या 100 वर कार्यकर्त्यांना अकोला पोलिसांनी स्थानबद्ध केलं आहे.

Congress Vs MNS
Bharat Jodo Yatra Maharashtra : शिंदे गटाच्या विरोधानंतरही 'भारत जोडो यात्रा' पार करणार महाराष्ट्रातला शेवटचा टप्पा

कोण मनसे? - नाना पटोले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना मनसेच्या भूमिकेबद्दल विचारण्यात आले तेव्हा नाना पटोले यांनी कोण मनसे? प्रतिसवाल उपस्थित केला. तसेच, राहूल गांधी यांनी राहूल गांधी यांनी मांडलेल्या भूमिकेचे समर्थन करताना ज्यांच्याकडे काही पुरावे असतील ते सादर करावेत असे म्हटले आहे. राहूल गांधी यांची यात्रा ही आता जनतेची यात्रा झाली असून, जनतेच्या यात्रेला मनसेला काळे झेंडे दाखवायचे असतील तर त्यांनी दाखवावेत. आणि मनसेने काळे झेंडे दाखवले तर आम्ही त्यांना गुलाबाचं फूल देऊ असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

Congress Vs MNS
Bharat Jodo Yatra: कॉंग्रेस नेत्यांचं वजन कमी होणार, भारत जोडो यात्रेवरुन उदय सामंतांचा टोला; Video

मनेसे नेते अविनाश देसाई म्हणाले, "राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात आली आहे. यापूर्वी अनेक राज्यात ही यात्रा होती पण, कोणत्याही राज्यात राहूल गांधी यांनी वादग्रस्ट स्टेटमेंट केले नाही. महाराष्ट्रात हे स्टेटमेंट त्यांनी का केले. राहूल गांधी आयुष्यभर ही सभा लक्षात ठेवतील. राहूल गांधी पंतप्रधान होवो न होवो किंवा इटलीला जावो पण, मनसेने उधळलेली सभा राहुल गाधी आयुष्यात लक्षात ठेवतील. सावरकरांवर आरोप करणे राहूल गांधीना शोभत नाही."

Congress Vs MNS
Riya Sen Join Bharat Jodo Yatra: भारत जोडोत राहुल गांधी-अभिनेत्री रिया सेन साथ-साथ !

महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केले राहुल गांधीचे समर्थन

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या टीकेचे महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे पणतू तुषार (Tushar Gandhi) गांधी यांनी समर्थन केले आहे. राहुल गांधी यांनी जे सांगितलं ते सत्यच आहे. कारण विनायक दामोदर सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागून नंतर त्यांच्याकडून पेन्शनही घेतलं होतं. पुढच्या काळात त्यांनी ब्रिटिशांसाठी कामही केलं होतं. असे तुषार गांधी म्हणाले. तुषार गांधी हे आज राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com