ZHZB Review :"कुणीतरी साराला रडायला शिकवा !" विकी -साराच्या 'जरा हटके जरा बचके'वर प्रेक्षकांची प्रतिक्रिया

विकी कौशल आणि सारा अली खानचा 'जरा हटके जरा बचके' शुक्रवारी (2 जून) रिलीज झाला आहे.
 ZHZB Review
ZHZB Review Dainik Gomantak
Published on
Updated on

सारा अली खान आणि विकी कौशल यांचा 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट शुक्रवार 2 जून 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. लक्ष्मण उतेकर यांनी या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचे लेखन केले असून दिग्दर्शनाची खुर्चीही त्यांनीच सांभाळली आहे. 

दिनेश विजन आणि ज्योती देशपांडे यांनी संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचा पहिला शो पाहिल्यानंतर सोशल मीडियावरही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. चला ZHZB चे Twitter रिव्यू पाहुया.

सारा चे जरा जरा काम

असं म्हणता येईल की, चित्रपटात साराने फक्त 'जरा जरा' काम केले. सारा आणि विकीचे सीन अप्रतिम आहेत. काही प्रेक्षकांनी अशीही प्रतिक्रिया की, कोणीतरी साराला स्क्रीनवर कसे रडायचे ते शिकवा.चित्रपटात विकी कौशल चांगला होता. चित्रपटाची कथा प्रेडिक्टेबल आहे आणि थोडीशी ताणल्यासारखी वाटते.

कथेत पुढे काय होणार हे जर प्रेक्षकांना आधीच कळत असेल तर ती अशक्त कथा समजली जाते अशा वेळी प्रेक्षक कथेत गुंतत नाहीत आणि चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही.

चित्रपटाचे बजेट आणि देशभरातील स्क्रीन्स

सारा अली खान आणि विकी कौशल यांच्या ZZZB हा चित्रपट 2 तास 12 मिनिटे इतक्या कालावधीचा आहे. देशभरातील 1500 स्क्रीन्सवर तो रिलीज झाला आहे. गेल्या बुधवारपासून त्याची अॅडवान्स बुकिंगही सुरू झाले असून, सुरुवातीच्या दिवशी 8 ते 9 कोटींचा गल्ला जमू शकतो, असा विश्वास आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाचे बजेट 40 कोटी रुपये आहे.

 ZHZB Review
Nargis Birth Anniversary: बॉलीवूडची ही सुपरस्टार रुग्णांची सेवा करण्यासाठी का धडपड करायची?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com