Nargis Birth Anniversary: बॉलीवूडची ही सुपरस्टार रुग्णांची सेवा करण्यासाठी का धडपड करायची?

अभिनेत्री नर्गीस स्टारडमच्या शिखरावर असतानाही ती हॉस्पिटलमध्ये पेशंटची सेवा करण्यासाठी जायची
Nargis Birth Anniversary
Nargis Birth AnniversaryDainik Gomantak
Published on
Updated on

अभिनेत्री नर्गीस दत्त हे नाव बॉलीवूड कधीही विसरणार नाही. तीन दशकांहून अधिक काळ चित्रपटाच्या पडद्यावर तसेच लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीतील त्या नायिकेची 1 जून ही जयंती. 

नर्गीस दत्त यांचं नाव देशातील महान अभिनेत्रींमध्ये केली जाते. १ जून रोजी नर्गिस दत्तची 94 वा जन्मदिवस आहे. आज ती हयात असती तर तिने आपला 94 वा वाढदिवस साजरा केला असता. 

चित्रपटात यायचेच नव्हते

3 मे 1981 रोजी नर्गिस यांचे कर्करोगाने निधन झाले. नर्गिसला तिच्या अभिनयाने जगभर प्रसिद्धी मिळाली होती. नर्गिसला 'रात और दिन'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, तर 'मदर इंडिया' या चित्रपटाने ऑस्कर पटकावले होते. पण, नर्गिसला कधीही फिल्मी दुनियेत येण्याची इच्छा नव्हती हे क्वचितच लोकांना माहीत असेल. तिला वडिलांचे एक स्वप्न पूर्ण करायचे होते.

सुनील दत्त यांची मुलाखत

नर्गिस दत्तचे पती आणि प्रसिद्ध अभिनेते सुनील दत्त यांनी 2003 मध्ये 'रेडिफ'ला दिलेल्या मुलाखतीत नर्गिसचे हे स्वप्न आणि सासऱ्यांची अपूर्ण इच्छा याबद्दल सांगितले. या मुलाखतीत सुनील दत्त यांनी हेही सांगितले होते की नर्गिस अनेकदा रुग्णालयात जाऊन रुग्णांची सेवा का करत असे.

नर्गिस यांचा जन्म आणि कुटूंब

नर्गिस दत्त यांचा जन्म १ जून १९२९ रोजी कोलकाता येथे झाला. तेव्हा तिचे नाव होते फातिमा रशीद. नर्गीसच्या वडिलांचे नाव अब्दुल रशीद होते. खरंतर नर्गीसच्या वडिलांचे मूळ नाव मोहनचंद उत्तमचंद त्यागी होते, पण नंतर नर्गिसच्या त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता.

नर्गीसचे वडील अतिशय श्रीमंत कुटुंबातील होते. तर नर्गिसची आई जद्दनबाई या सुप्रसिद्ध गणिका आणि हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका होत्या.

Nargis Birth Anniversary
Narendra Nath Razdan Passes Away: आलियाचे आजोबा नरेंद्रनाथ राजदान यांचे निधन

म्हणून नर्गिस हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेसाठी जायच्या

सुनील दत्त यांनी सांगितले होते की, नर्गिसच्या वडिलांची इच्छा होती की मुलीने डॉक्टर व्हावे. नर्गिसच्या वडिलांना डॉक्टर व्हायचे होते ;पण त्यांचे स्वप्न नर्गीसला कधीच पूर्ण करता आले नाही. त्यामुळेच नर्गिसने डॉक्टर बनून वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. 

पण त्यानंतरच नर्गिसला हिरोईन बनण्याच्या ऑफर्स येऊ लागल्या. सुनील दत्त यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा नर्गिसला चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या, तेव्हा ती खूप लहान होती नंतर तिला स्वतःचे निर्णयही घेता आले नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com