Urvashi Rautela Viral Video : असं नाचायचंच कशाला ??? उर्वशीचा ड्रेस थोडक्यात.... व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री उर्वशी रौतेला कान्स फिल्म फेस्टिव्हल उप्स मोमेंटपासुन थोडक्यात वाचली आहे.
Urvashi Rautela Viral Video
Urvashi Rautela Viral VideoDainik Gomantak

Cannes 2023 Urvashi Rautela : सध्या मनोरंजन विश्वात कान्स फिल्म फेस्टिव्हलची जोरदार चर्चा सुरू आहे. या महोत्सवात सहभागी झालेल्या अनेक अभिनेत्रींची चर्चा सुरू आहे. त्यातच आता उर्वशीचा एक व्हिडीओ समोर आला आणि सोशल मिडीयावर तो व्हायरलही झाला.

जगप्रसिद्ध कान्स चित्रपट महोत्सवामध्ये बॉलीवूडच्या तारकांची हवा आहे. त्यांच्या फोटोंना मिळणारा प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले आहे. आतापर्यत ऐश्वर्या रॉय, सारा अली खान, मृणाल ठाकूर, मानुषी छिल्लर, ईशा गुप्ता यांचे फोटो व्हायरल झाले होते. यासगळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री आणि टीव्ही मनोरंजन विश्वातील सेलिब्रेटी उर्वशी रौतेला चर्चेत आली आहे.

उर्वशीचा एक व्हिडिओ व्हायरल

उर्वशीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तिचा नारंगी रंगाचा तो ड्रेस चाहत्यांना आवडला असून त्यावर त्यांनी उर्वशीचे कौतुकही केले आहे. उर्वशी एका गाण्यावर डान्स करत असून अचानक तो ड्रेस खाली सरकल्याचे दिसून येते. त्यामुळे काही काळ उर्वशी देखील भांबावून जाते. तिनं चटकन स्वताला सावरत तो प्रसंग टाळला आहे

नेटकरी करतायत ट्रोल

व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओवर मात्र नेटकऱ्यांनी उर्वशीची चांगलीच शाळा घेतली आहे. तू कान्समध्ये गेली खरी पण त्याचे किती फोटो टाकणार आहे. यापूर्वी उर्वशीचा हिरवी लिपस्टिक लावल्याचा फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर नेटकऱ्यांनी उर्वशीला ऋषभच्या नावानं चिडवण्यास सुरुवात केली होती. आताही तिच्या व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Urvashi Rautela Viral Video
Rajinikanth Retirement : थलैवाचा इंडस्ट्रीला बाय बाय? रजनीकांतचा हा शेवटचा चित्रपट असल्याची चर्चा....

यूजर्सच्या भन्नाट कमेंट

एका युझर्सनं तो व्हिडिओ पाहिल्यावर म्हटले आहे की, तू तर क्रिश ३ ची कंगना दिसते आहेत. आणि शेवटी जे काही होतं ते कमाल आहे. तू थोडी काळजी घ्यायला हवी. दुसऱ्यानं लिहिलं आहे की, कान्सला गेली म्हणून किती पोस्ट शेयर करायच्या.

तिसऱ्यानं तर उर्वशीच्या हेअर स्टाईलवर देखील कमेंट केली आहे. त्यामुळे उर्वशी चर्चेत आली आहे. यापूर्वी देखील उर्वशीनं कान्स महोत्सवाचे शेअर केलेले फोटो चाहत्यांच्या कौतुकाचा विषय होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com