Rajinikanth Retirement : थलैवाचा इंडस्ट्रीला बाय बाय? रजनीकांतचा हा शेवटचा चित्रपट असल्याची चर्चा....

आपल्या अभिनयाने करोडो प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलेल्या रजनीकांत निवृत्त होणार असल्याची चर्चा सुूरू आहे.
Rajinikanth Retirement
Rajinikanth RetirementDainik Gomantak

साऊथ सिनेसृष्टीतील स्टार बद्दल बोलायचं झालं तर रजनीकांत यांचे नाव टॉप लिस्टमध्ये समाविष्ट आहे. त्यांना अभिनय विश्वाचा मास्टर म्हटलं जात रजनीकांत कोणत्याही वेगळ्या ओळखीवर अवलंबून नाही. रजनीकांतचे चाहते जगभरातून आहेत.

ते त्यांच्या अनेक चित्रपटांसाठी ओळखला जातो. दाक्षिणात्य व्यतिरिक्त हिंदीतही उत्कृष्ट चित्रपट करून या त्यानी आपलं अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे.

आता रजनीकांत यांच्याबद्दल बातमी समोर आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून लोकेश कनगराजसोबतचा चित्रपट हा रजनीकांत यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट असू शकतो. अशा चर्चांना उधाण आलं आहे.

जर असं झालं तर थलैवाच्या फॅन्सना या गोष्टीचा प्रचंड धक्का बसु शकतो. गेली 4 दशके देशभरातल्या प्रेक्षकांना आपल्या अभिनय आणि स्टाईलने वेड लावणाऱ्या थलैवाचे फॅन्स त्यांना देव मानतात.

तमिळ सुपरस्टार रजनीकांत लोकेश कनागराज दिग्दर्शित त्यांच्या 171 व्या चित्रपटानंतर चित्रपटसृष्टीतून निवृत्त होण्याचा विचार करत असल्याचं वृत्त आहे.

तमिळ चित्रपट निर्माते मैसस्किन (Mysskin) यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, दिग्दर्शक लोकेश कंगराज यांच्यासोबतचा प्रस्तावित चित्रपट हा सुपरस्टार रजनीकांतच्या चित्रपट कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट असू शकतो. त्यानंतर चर्चाला उधाण आले आहे.

दिग्दर्शक लोकेश कंगराज व्यक्त केलेल्या या शक्यतेची चर्चा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुरू आहे ;पण रजनीकांतच्या अनेक चाहत्यांनी यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला.

रजनीकांत असं करु शकत नाही असं चाहत्यांच म्हणणं आहे. त्याचबरोबर जर ते असं करणार असतील तर त्यांनी त्याचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणीही चाहते करत आहेत.

Rajinikanth Retirement
Anurag Kashyap son-in-law : अनुराग कश्यपचा होणारा जावई कोण आहे? चला जाणुन घेऊया शेन ग्रेगोयरबद्दल..

रजनीकांत यांच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचं झालं तर, रजनीकांतच्या 169 व्या चित्रपटाचं नाव जेलर आहे. त्याचं शूटिंगही पूर्ण झालं आहे.

या चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे. जेलर 10 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर रजनीकांत 'लाल सलाम' या आणखी एका चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे, या चित्रपटाचा लूक नुकताच समोर आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com