72 Hoorain : केरळ स्टोरीनंतर आलेल्या 72 हूरे ची गोष्ट काय आहे? दोन्ही चित्रपटात कोणता सारखेपणा आहे?

केरळ स्टोरीनंतर आलेल्या 72 हूरे या चित्रपटाची इतकी चर्चा का होतेय? दोन्ही चित्रपटांमध्ये नेमकं काय साधर्म्य आहे?
72 Hoorain
72 Hoorain Dainik Gomantak
Published on
Updated on

 गेले काही काळ द केरळ स्टोरी या चित्रपटावर सर्वत्र चर्चा सुरू असताना आणि वाद विवाद सुरू असताना आता '72 हूरे' या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सोशल मिडीयावर सुरू आहे. या चित्रपटाचा टिजरही नुकताच रिलीज झाला आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्या द केरळ स्टोरीवरुन मोठ्या वादाला सुरुवात झाली होती. भलेही त्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली असली तरी त्या चित्रपटाच्या विषयावरुन सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. धर्मांतर आणि दहशतवाद सारख्या विषयाची मांडणी केरळ स्टोरीमधून करण्यात आली होती.

केरळ स्टोरीसारखाच विषय

सध्या सोशल मीडियावर द केरळ स्टोरीनंतर ७२ हुरे नावाच्या चित्रपटावरुन वादाला सुरुवात झाल्याचे दिसून येते आहे. त्यावर काश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सणसणीत प्रतिक्रियाही दिली आहे. जी चर्चेत आली आहे.

केरळ स्टोरीविषयी सांगायचे झाल्यास या चित्रपटाला मिळणारा प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यावरुन होणारा वाद, काही ठिकाणी त्याच्या प्रदर्शनावर घालण्यात आलेली बंदी यामुळे वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते.

'72 हूरे'चा फर्स्ट लूक

या सगळ्यात ७२ हुरे नावाच्या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हायरल झाला असून त्यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. यावेळी पुन्हा एकदा कट्टर धर्मिय व्यक्तींनी, काही संघटनांनी त्यावरुन दिलेल्या प्रतिक्रिया लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. सोशल मीडियावर ७२ हुरे नावाच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक हा ट्रेडिंगचा विषय आहे. यासगळ्यात प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

'72 हूरे'ची सोशल मिडीयावर चर्चा

पवन मल्होत्रा आणि आमिर बशीर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होतती. अशोक पंडित यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचा टीझर अशावेळी आला आहे जेव्हा देशामध्ये लव जिहाद वरुन वेगळ्या प्रकारची चर्चा सुरु आहे.

लव जिहाद हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवूनच 'द केरळ स्टोरी' सारख्या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हा चित्रपट ७ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. अग्निहोत्री यांनी अशोक पंडित यांचे अभिनंदन केले आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असे त्यांनी म्हटले आहे.

72 Hoorain
Kollam Sudhi Passes Away : भय इथले संपत नाही... आता कार अपघातात साऊथच्या या अभिनेत्याचे निधन..

द्वेष हा फार काळ चालणार नाही

त्यावर एका युझर्सनं दिलेली प्रतिक्रिया अनेकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. मुस्लिम लोकांना नकारात्मक दृष्ट्या दाखवून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे.

तेव्हा प्रेक्षकांनी सजगपणे त्या गोष्टींचा विचार करावा. दुसऱ्या युझर्सनं लिहिलं आहे की, द्वेष हा काही फार वेळ चालणारा नाही हे सगळ्यांनी लक्षात घेण्याची गोष्ट आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com