Kollam Sudhi Passes Away : भय इथले संपत नाही... आता कार अपघातात साऊथच्या या अभिनेत्याचे निधन..

साऊथचे प्रसिद्ध अभिनेते कोल्लम सुधी यांचं कार अपघातात निधन
Kollam Sudhi Passes Away
Kollam Sudhi Passes AwayDainik Gomantak
Published on
Updated on

मनोरंजन विश्वात गेल्या काही दिवसांपासून धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. मनोरंजन विश्व सतत काही ना काही घडामोडींमुळे चर्चेत असतं, आता मात्र गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वात एकामागून एक दु:खद घटना घडत आहे. चित्रपट सृष्टीपासून ते टीव्हीविश्वापर्यंत प्रसिद्ध कलाकार जगाचा निरोप घेत आहे. काही दिवसांपुर्वी सहा दिवसात चार कलाकार आपल्याला सोडून गेले.

४ जून रोजी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांनी देखील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या दु:खातुन बाहेर पडलो नाहित तोच आता आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे.

मल्याळम अभिनेते कोल्ली सुधी

प्रसिद्ध मल्याळम अभिनेता कोल्लम सुधी यांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात त्याचा मृत्यू झाला असून अन्य तीन कलाकार गंभीर जखमी झाले आहेत.

अमर उजाला दिलेल्या वृत्तांनुसार,पोलिसांनी सांगितले की, सुधी, उल्लास अरूर, बिनू आदिमाली आणि महेश ज्या कारमध्ये प्रवास करत होते ती पहाटे 4.30 च्या सुमारास कपमंगलम येथे एका ट्रकला धडकली.

कोल्लम सुधी यांच्या डोक्याला मार

या अपघातात 37 वर्षीय कोल्लम सुधी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना थिसुरमधील कोडुंगल्लूर येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. तर कॉमेडियन बिनू आदिमाली, उल्लास आणि महेश जखमी आहे

कोल्लम सुधीने 2015 मध्ये रिलीज झालेल्या 'कंथारी'मधून ऑनस्क्रीन पदार्पण केले. 'कट्टापनायाले ऋत्विक रोशन', 'कुट्टनादन मारप्पा', 'थिटा रप्पई', 'वकाथिरिवू', 'अॅन इंटरनॅशनल लोकल स्टोरी', 'एस्केप', 'केसू ए वेदिंटे नाधान' आणि 'स्वर्गथिले कत्तुरुम्बू' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केल होत. त्याच्या जाण्याने मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे.

Kollam Sudhi Passes Away
Gufi Paintal Passes Away : "महाभारतातले शकुनी मामा गेले"...ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल यांचं निधन

मनोरंजन विश्वाला अनेक हादरे

काही तासांपूर्वी अभिनेते गुफी पेंटल यांचं निधन झाल्याची बातमी आली, तर 3 जूनच्या सायंकाळी प्रसिद्ध अभिनेत्री सुलोचना यांचं निधन झालं. त्यापूर्वी अभिनेता नितीन गोपी यांनीही जगाचा निरोप घेतला. मनोरंजन विश्वातून सलग येत असलेल्या बातम्यांमुळे कलाकारांसह चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com