Anurag Kashyap On 'The Kerala Story': चित्रपटावरुन होणारा वाद आणि त्याचं उग्र स्वरूप आपल्या देशासाठी नवीन नाही. सध्या देशभरात केरळ स्टोरीचा वाद सुरू आहे. 'द केरळ स्टोरी'वरून सातत्याने वाद सुरू आहेत.
5 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अनेक ठिकाणी वाहवा मिळवली तर काही ठिकाणी त्याच्यावर जोरदार टीकाही होत आहे. त्यावर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
याआधी साऊथ सुपरस्टार 'कमल हासन' यांनी याला प्रोपगंडा फिल्म म्हटले होते. त्यांनी चित्रपटाच्या कथेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते ;आणि आता दिग्दर्शक अनुराग कश्यपनेही या चित्रपटाबद्दल असेच काहीसे सांगितले आहे.
एका न्यूज पोर्टलशी खास बातचीत करताना अनुराग कश्यपने सांगितले, 'आजच्या युगात राजकारणापासून कोणीही वाचलेले नाही. आजकाल सिनेमा बिगर-राजकीय असणे खूप अवघड आहे.
द केरळ स्टोरी सारखे अनेक प्रोपगंडा चित्रपट बनवले जात आहेत. मी कोणत्याही गोष्टीवर बंदी घालण्याच्या विरोधात आहे पण हा चित्रपट खरोखरच प्रचारात्मक चित्रपट आहे यावर मी ठाम आहे.
अनुराग कश्यप पुढे म्हणाला की, तो एक फिल्ममेकर आहे. आणि यामुळे, कोणत्याही प्रचारक चित्रपटाला विरोध करणारा किंवा कार्यकर्त्यासारखा वाटेल असा चित्रपट बनवायचा नाही.
मी सिनेमा बनवत असून सिनेमा सत्य आणि वास्तवावर आधारित असला पाहिजे, असेही अनुराग कश्यप म्हणाला .
जेव्हा अनुराग कश्यपला विचारण्यात आले की, देशाला सामाजिक-राजकीय वातावरण निर्माण शकेल असे चित्रपट बनवायचे आहेत का? यावर अनुराग म्हणाला की "तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्ही हे करू शकता".
पुढे बोलताना अनुराग म्हणाला "कुणीही काहीही थांबवू शकत नाहीत जी वस्तुस्थिती आहे आणि जी कोणाचीही बाजू घेत नाही. ते पुढे म्हणाले की, प्रतिप्रचारात अप्रामाणिकता असू शकतो, पण खरे सांगायचे तर ते लढू शकत नाहीत".
पश्चिम बंगालमध्ये 'द केरळ स्टोरी'वर बंदी घालण्यात आली होती. त्याच वेळी, तामिळनाडू सरकारनेही त्याच्या स्क्रीनिंगवर बंदी घातली होती.
मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दोन्ही राज्यांना चित्रपट दाखविण्याचे आदेश देण्यात आले आणि सुरक्षेची काळजी घेण्याचा निर्णय देण्यात आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.