Vivek Agnihotri On Nawaz : "मग तुझ्या चित्रपटावरही बंदी घालायची का"? विवेक अग्नीहोत्रींच्या निशाण्यावर नवाजुद्दीन...

द कश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांनी नवाजुद्दीन सिद्दीकीवर निशाणा साधला आहे.
Vivek Agnihotri On Nawaz
Vivek Agnihotri On NawazDainik Gomantak
Published on
Updated on

नवाजुद्दीन सिद्दीकी विवेक अग्निहोत्री आता विवेक अग्निहोत्रीने 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाबाबत नवाजुद्दीन सिद्दिकीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या चित्रपटांवर आणि शोवरही बंदी घालायची का, असा सवाल त्यांनी केला आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीने चित्रपटांवर बंदी घालण्याबाबत केलेल्या विधानावर स्पष्टीकरण दिले असेल, परंतु आता चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. नवाजुद्दीनचे चित्रपट आणि ओटीटीवर येणार्‍या शोवरही बंदी घालायची का, असा सवाल त्यांनी केला आहे. 

नवाजुद्दीन सिद्दीकीने 'द केरळ स्टोरी'वरील बंदीला पाठिंबा का दिला?

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी मीडियामध्ये बातम्या आल्या होत्या की नवाजुद्दीन सिद्दीकीने काही राज्यांमध्ये द केरळ स्टोरीवरील बंदीला पाठिंबा दिला होता . या वृत्तांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, अभिनेत्याने ही खोटी बातमी असल्याचे म्हटले आणि स्पष्ट केले की कोणत्याही चित्रपटावर बंदी घातली जाऊ नये असे मला कधीच वाटत नव्हते. 

आता चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. यावर, अभिनेत्याने स्पष्ट केले आहे की मी द केरळ स्टोरीवरील बंदीला अजिबात समर्थन देत नाही.

विवेक अग्निहोत्रींचा नवाजुद्दीन सिद्दीकीला प्रश्न

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आरोपांना उत्तर देताना विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट केले आहे. "भारतातील बहुतांश मध्यमवर्गीय कुटुंबांना चित्रपट आणि ओटीटी शोमध्ये कोणत्याही कारणाशिवाय अपमानित आणि हिंसाचाराला सामोरे जावे लागत असल्याचे दाखवले जाते. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या चित्रपटांवर आणि ओटीटीवरील शोवर बंदी घालू नये का? यावर तुमचे काय मत आहे?"

चित्रपटांवरील बंदीबाबत नवाजुद्दीन सिद्दीकी काय म्हणाला?

याआधी, नवाजुद्दीन सिद्दीकीने ट्विट करून लिहिले होते, " व्ह्यूज आणि हिट्स मिळवण्यासाठी खोट्या बातम्या पसरवू नका. याला स्वस्त टीआरपी म्हणतात. कोणत्याही चित्रपटावर बंदी घालावी, असे मी कधीच म्हटलेले नाही. चित्रपटांवर बंदी घालू नये. खोट्या बातम्या पसरवू नका."

Vivek Agnihotri On Nawaz
Kajol's Memory Of Fanaa : जेव्हा मायनस 27 डिग्रीच्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत काजोलनं हे गाणं शूट केलं होतं....

द केरळ स्टोरीने बॉक्स ऑफिसवर कमाई

केरळ स्टोरीमध्ये अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपट भारतातील इसिसचा प्रचार आणि दहशतवादाचा अजेंडा उघड करतो. याचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com