Superstar Yash : खिशात फक्त 30 रुपये घेऊन रॉकी भाई कुठं गेला होता ?...सुपरस्टार यशची गोष्ट

आज एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये घेणारा यश एकेकाळी खुप संघर्षात जीवन जगत होता.
Story of  Superstar Yash
Story of Superstar YashDainik Gomantak

Story of Superstar Yash : एखादी मोठी गोष्ट मिळवताना अनेक गोष्टींंचा सामना करावा लागतो. कित्येकदा सगळी शक्ती गमावुन बसायला होतं, ध्येय खुप दुर असतं ;पण चालत राहावं लागतं. ही गोष्ट केवळ पुस्तकातली किंवा सांगण्योपुरती नाही, तर कित्येक लोक ही गोष्ट आपल्या जगण्यातुन सिद्ध करत असतात. कित्येक यशस्वी लोकांच्या प्रवासाकडे पाहिलं की हेच दिसतं

सुपरस्टार यश हे असंच एक उदाहरण. केजीएफ या गाजलेल्या चित्रपटाने जगभरात आपल्या नावाची दखल घ्यायला लावणारा यश आज कुणासाठीही अनोळखी नाही.

आज एका चित्रपटासाठी कोट्यवधीचं मानधन घेणारा यश सहजासहजी या ठिकाणी पोहोचला नाही. त्यासाठीचा त्याचा प्रवास रिकाम्या खिशापासुन सुरू झाला होता.

सुपरस्टार यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा हे आहे ;पण आज पडद्यावर तो यश म्हणुनच ओळखला जातो. यश कर्नाटकातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातुन आला आहे, खिशात फक्त 300 रुपये घेऊन तो बेंगलोरला पोहोचला. घरात कला क्षेत्राची काही पार्श्वभूमी नसताना यश या क्षेत्रात आला होता, त्याचे वडील एक बस ड्रायव्हर होते.

खिशात पैसे नसले तरी मनात जिद्द होती. त्याला मिळवायचं होतं त्या गोष्टीचं वेड त्याला बेंगलोर शहरात खेचुन आणलं. तिथे गेल्यावर त्याने बेंगलोरचा एक थिएटर ग्रुप जॉईन केला, त्या ग्रुपचा पार्ट होण्यासाठीही त्याला खुप संघर्ष करावा लागला.

खुप मेहनत केल्यानंतर त्याला दुय्यम भूमीका मिळत गेल्या. आणि मग मुख्य अभिनेत्याकडे जाण्यासाठी त्याचा प्रवास सुरू झाला.

काही चित्रपटांसाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणुनही काम केले या काळात त्याने काही टिव्ही सिरीयल आणि चित्रपटांसाठी त्याने ऑडिशन द्यायला सुरूवात केली होती.

Story of  Superstar Yash
Shankar Mahadevan: ‘दिल चाहता है’ म्हणजे गोवा! शंकर महादेवन यांनी जागवल्या गोव्याच्या आठवणी

यशचा पहिला चित्रपट 2008 साली रिलीज झाला. Moggina Manasu नावाच्या या चित्रपटात त्याने सहाय्यक अभिनेता म्हणुन केली होती. या चित्रपटासाठी त्याला अ‍ॅवॉर्डही मिळाला होता. यानंतर त्याची यशस्वी घोडदौड सुरू झाली. आणि आज यशचं नाव सार्थ ठरलं आहे.

300 रुपयांपासुन सुरू झालेला यशचा प्रवास आज शिखरावर आहे. यश केवळ एक चांगला अभिनेताच नाही तर एक चांगला पती, चांगला पितासुद्धा आपल्या फॅमिलीला वेळ देण्यात तो कधीही कमी पडत नाही. यशसारखे कलाकार नक्कीच नव्या अभिनेत्यांना प्रेरणा देत असतात

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com