The Kerala Story Movie Review: कथेच्या खरेपणावरून वादग्रस्त ठरलेला द केरला स्टोरी अखेर रिलीज.. चला पाहुया कसा आहे चित्रपट?

सुप्रिम कोर्टापर्यंत गेलेला वादग्रस्त चित्रपट 'द केरला स्टोरी' नेमका कसा आहे?
The Kerala Story
The Kerala StoryDainik Gomantak
Published on
Updated on

The Kerala Story Movie Review: सध्या सुरू असलेल्या वादांमध्ये दिग्दर्शक सुदीप्तो सेनचा 'द केरळ स्टोरी' शुक्रवारी, ५ मे रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. सुप्रिम कोर्टापर्यंत पोहोचलेला हा चित्रपट नेमका कसा आहे चला जाणुन घेऊया या फिल्म रिव्यूहमधुन.

वादांमुळे निर्मात्यांना चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही बदल करावे लागले. तसं पाहिलं तर सत्य घटनांवर आधारित चित्रपट बनवणं हे चित्रपट निर्मात्यांना नेहमीच आकर्षित करत आले आहे, पण जेव्हा निर्माता सत्य घटना पडद्यावर आणतो, तेव्हा त्याची जबाबदारी वाढते. 

काल्पनिक कथांमध्ये सिनेमॅटिक लिबर्टी घेता येते, परंतु सत्य घटनांवर आधारित चित्रपटात अगदी लहान अतार्किक मुद्दाही अडकतो आणि प्रेक्षकांवर जो परिणाम व्हायला हवा तो होत नाही. 

केरळमधील तरुण हिंदू मुलींचे कथित धर्मांतर आणि कट्टरतेवर हा चित्रपट बोलतो. हा चित्रपट केरळमधील तीन तरुणींच्या सत्यकथेवर आधारित असल्याचा दावा करण्यात आला आहे.

कथेच्या सुरुवातीलाच फातिमा उर्फ ​​शालिनी उन्नीकृष्णन (अदा शर्मा) हिला तपास अधिकाऱ्यांनी घेरलेलं दिसतं. तिचा भयंकर आणि वेदनादायक भूतकाळ ती सांगत असते, 'ती ISIS मध्ये कशी सामील झाली त्याबद्दल ती बोलते.

त्यानंतर मागची कहाणी सुरू होते, जिथे चार विद्यार्थिनी केरळमधील कासरगोड येथील नर्सिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतात, शालिनी तिच्या रूममेट्स गीतांजली (सिद्धी इदनानी), निमा (योगिता बिहानी) आणि असिफा (सोनिया बालानी) यांच्यासोबत एक खोली शेअर करते.त्या तिच्या जवळच्या मैत्रिणी बनतात. . शालिनी, गीतांजली आणि निमाला असिफाच्या वाईट हेतूंबद्दल अजीबात माहिती नसते.

वास्तविक असिफाचा एक छुपा अजेंडा आहे की तिच्या रूममेट्सना त्यांच्या कुटुंबापासून आणि धर्मापासून दूर नेऊन इस्लाममध्ये बदलण्याचा. त्यासाठी ती आपल्या दोन खोट्या भावांचा आधार घेते आणि असा सापळा रचते की मुली कट्टरपंथी बनतात.

त्यांचे ब्रेनवॉश करण्यासाठी त्यांना ड्रग्ज दिले जाते, कुटुंबाबद्दल द्वेष आणि धर्मावर अविश्वास निर्माण केला जातो. इतकेच नाही तर शालिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवणारा रमीझ तिला गरोदर बनवतो. 

समाजाच्या भीतीमुळे शालिनी इस्लामचा स्वीकार करते, अज्ञात व्यक्तीशी लग्न करते आणि भारत सोडून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमार्गे सीरियाला पळून जाते. पुढचा प्रवास शालिनीसाठी आणखीनच भयावह ठरतो, इथे भारतात तिच्या मैत्रिणी गीतांजली आणि निमालाही नरकयातना भोगाव्या लागतात .

The Kerala Story
MS Dhoni: The Untold Story: फॅन्ससाठी आनंदाची बातमी! थिएटरमध्ये पुन्हा पाहाता येणार 'कॅप्टनकूल'चा प्रवास

चित्रपटातील मुलींचे ब्रेनवॉश करण्याची प्रक्रिया खूपच बालिश दिसते. आसिफा आणि तिचे साथीदार ज्या प्रकारे पदवीधर मुलींना फसवतात ते त्यांना पटण्यासारखे वाटत नाही.

हॉस्पिटलमध्ये पडलेल्या वडिलांवर गीतांजली थुंकते, शालिनी कोलंबोमध्ये सत्य माहीत असूनही सीरियाला जाते, अशी अनेक दृश्ये आहेत जी तर्काला धरुन नाहीत.

चित्रपटातील हिंसक आणि बलात्काराची दृश्ये दुर्बल मनाच्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकतो शकतात. विविध समाज आणि विचारसरणीच्या लोकांच्या भावना दुखावणारे असे अनेक संवादही आहेत. चित्रपटाचं एडिटिंगही विशेष म्हणता येणार नाही.

मात्र, प्रशांतनु महापात्रा यांच्या सिनेमॅटोग्राफीमध्ये केरळपासून अफगाणिस्तानपर्यंतचा प्रवास अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे.

The Kerala Story
Top 5 Novel Based Web Series: पुस्तकांच्या पानांवरच्या कथा जेव्हा वेबसिरीज बनतात, कादंबरीवर आधारित या 5 सिरीज पाहाच...

अभिनयाच्या बाबतीत, अदा शर्माने एकीकडे शालिनीच्या रूपात तिची निरागसता आणि दुसरीकडे फातिमाच्या रूपात भीती, असहायता, राग आणि वेदना दाखवल्या आहेत.

चित्रपटातील अदाचे काम कौतुकास्पद आहे. मैत्रिणी म्हणून योगिता बिहानी आणि सिद्धी इदनानी यांनीही त्यांच्या भूमिकांना न्याय दिला आहे, पण त्यांच्या पात्रांमध्ये खोल नाही. सपोर्टिंग कास्ट ठीक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com