Diary Of Bengal Trailer : केरळ स्टोरीनंतर आता 'द डायरी ऑफ बंगाल'...रिलीजआधी वादग्रस्त ठरलेल्या चित्रपटाचं ट्रेलर पाहा...

द केरळ स्टोरी या चित्रपटाच्या वादानंतर 'द बंगाल स्टोरी' या चित्रपटाचा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Diary Of Bengal Trailer
Diary Of Bengal TrailerDainik Gomantak
Published on
Updated on

द केरळ स्टोरी या चित्रपटाने निर्माण झालेला अभूतपूर्व वाद अजुनही ताजा असताना आता 'द डायरीज ऑफ वेस्ट बंगाल' नावाचा चित्रपट नवे वाद निर्माण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्या द केरळ स्टोरीनं साऱ्या देशभरात वाद निर्माण झाला होता.या चित्रपटाला न्यायालयातही खेचण्यात आले होते.

बंगाल डायरीच्या निमित्ताने हा वाद पुन्हा निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. द डायरी ऑफ बंगाल या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असुन या ट्रेलरची चर्ची सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात होत आहे.

द डायरीज ऑफ वेस्ट बंगाल

पश्चिम बंगालमधील एका दिग्दर्शकानं तयार केलेल्या द डायरीज ऑफ वेस्ट बंगाल नावाच्या चित्रपटानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून डायरीज ऑफ वेस्ट बंगालची चर्चा होती.

त्यातून पश्चिम बंगालची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप प्रशासनाकडून करण्यात आला आहे. यानंतर प्रशासनाकडून या चित्रपटाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.

बंगाल पोलिस संचालक म्हणतात

सनोज मिश्रा यांनी द डायरीज ऑफ वेस्ट बंगालचे दिग्दर्शन केले असून सोशल मीडियावर त्याबाबत मोठी चर्चा आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची दबक्या आवाजात चर्चा होती.

बंगाल पोलीस संचालकांनी हा चित्रपट बंगालची प्रतिमा मलिन करणारा आहे. त्यातून वातावरण अशांत होण्याची शक्यता आहे. असे म्हणून निर्मात्यांच्या विरोधात नोटीस जाहीर केली आहे. एएनआयनं ट्विट करुन याविषयी आधिक माहिती दिली आहे.

Diary Of Bengal Trailer
Satish Kaushik Last Tweet: सतीश कौशिक यांचे 'हे' ट्विट ठरले शेवटचे

दिग्दर्शकाची चौकशी

त्या ट्विटमध्ये उल्लेख केल्यानुसार, हा चित्रपट पश्चिम बंगाल विषयक वेगळी प्रतिमा तयार करणारा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांना ३० मे रोजी सीआरपीसीच्या ४१ कलम अ नुसार चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. तसेच आणखी वेगवेगळ्या कलमानुसार त्यांच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

वसीम रिज्वी यांच्या बॅनरच्या सहकार्यातून तयार होणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती नारायण सिंह यांनी केली आहे. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याचे सांगण्यात आले आहे.

द केरळ स्टोरीचाही असाच वाद अन् न्यायालयीन लढाई

एकीकडे मध्यप्रदेश, हरियाणा आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त आला असताना दुसरीकडे त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची भाषा केली जात होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या पश्चिम बंगालमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. अशी भूमिका घेतली होती.

खरं तर ममता यांनी यापूर्वी देखील इतरही काही चित्रपटांच्याबाबत अशी भूमिका घेतल्याचे दिसून आले होते. त्यामुळे बंगालमधील काही निर्माते आणि दिग्दर्शक यांनी त्यांच्या भूमिकेवर टीका केली होती. आता हाच वाद द डायरी ऑफ वेस्ट बंगाल या चित्रपटाबाबत होऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com