Satish Kaushik Last Tweet: सतीश कौशिक यांचे 'हे' ट्विट ठरले शेवटचे

प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे आज सकाळी वयाच्या 66 व्या वर्षी मुंबईत निधन झाले आहे.
Satish Kaushik Last Tweet
Satish Kaushik Last TweetDainik Gomantak

Satish Kaushik Last Tweet: प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे आज सकाळी वयाच्या 66 व्या वर्षी मुंबईत निधन झाले आहे. त्यांचे जवळचे मित्र, अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

सतीश कौशिक यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. सतीश यांच्या निधनानंतर सोशल मीडियावरुन अनेक कलाकारंनी श्रध्दाजली वाहली आहे. दरम्यान सतीश कौशिक यांचे शेवटचं ट्विट आता व्हायरल होत आहे.

सतीश कौशिक यांचे लास्ट ट्विट

सतीश कौशिक यांनी आपल्या शेवटच्या ट्विटमध्ये (Tweet) होळीच्या शुभेच्छा देत लिहल की, 'रंगाचा, आनंदाचा सण, जावेद अख्तर यांची होळी पार्टी... भेटा या नवविवाहीत जोडप्याला अली फझल आणि रिचा चड्ढा'. हे ट्विट आता व्हायरल होत आहे.

सतीश कौशिक यांनी दोन दिवसांपूर्वी होळी (Holi) खेळली होती. ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर यांच्या घरी या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमधील काही फोटो (Photo) त्यांनी आपल्या ट्विटवर शेअर केले होते.

सतीश कौशिक यांचे पार्थिव सध्या दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर दुपारी त्यांचे पार्थिव मुंबईत आणले जाईल आणि त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. सतीश कौशिक हे गुडगाव येथील एका फार्महाऊसवर कोणालातरी भेटण्यासाठी गेले होते. फार्म हाऊसवरून परतत असताना सतीश कौशिक यांना कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांना गुडगावच्या फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले होते.

चित्रपट अभिनेता म्हणून सतीश कौशिक यांना 1987 च्या मिस्टर इंडिया चित्रपटाच्या कॅलेंडरमधून ओळख मिळाली. यानंतर त्यांनी 1997 मध्ये आलेल्या दिवाना मस्तानामध्ये पप्पू पेजरची भूमिका साकारली होती. सतीश कौशिक यांना 1990 मध्ये राम लखन आणि 1997 मध्ये साजन चले ससुरालसाठी सर्वोत्कृष्ट कॉमेडियनचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

सतीश कौशिक यांचे शालेय शिक्षण दिल्लीत झाले. किरोरी माल महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मध्ये प्रवेश घेतला. 1983 मध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 1985 मध्ये तिने शशी कौशिकसोबत लग्न केले. मात्र लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या मुलाचे वयाच्या दुसऱ्या वर्षी निधन झाले.

दिग्दर्शक म्हणून सतीश कौशिक यांनी जहाँ रूप की रानी चोरों का राजा, प्रेम, हम आपके दिल में रहते हैं, हमारा दिल आपके पास है, मुझे कुछ कहना है, बधाई हो बढाई, तेरे नाम, क्यूंकी, ढोल, कागज यासारख्या उत्कृष्ट चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

  • कंगना रणौत

अभिनेत्री कंगना रणौतने ट्विटरवर सतीश यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करुन लिहिलं, 'सकाळी उठल्यावर ही धक्कादायक बातमी कळाली.  सतीश  हे खूप चांगले अभिनेते आणि दिग्दर्शक होते. आम्हाला त्यांची आठवण येईल. ओम शांती.'

अनुपम खेर

मृत्यू हे अंतिम सत्य आहे हे मला माहीत आहे. पण मी माझ्या जिवलग मित्र सतीश कौशिक बद्दल असे कधी लिहीन असे स्वप्नातही वाटले नव्हते. 45 वर्षांच्या मैत्रीला अचानक पूर्णविराम मिळाला. सतीश तुझ्याशिवाय आयुष्य अजिबात सारखे नसेल! ओम शांती. असे ट्विट अभिनेते अनुपम खेर यांनी केले आहे.

तसेच, अभिनेता म्हणून त्यांनी मिस्टर इंडिया, मोहब्बत, जलवा, राम लखन, जमाई राजा, अंदाज, मिस्टर अँड मिसेस खिलाडी, साजन चले ससुराल, दीवाना मस्ताना, परदेसी बाबू, बडे मियाँ छोटे मियाँ, हसिना मान जायेगा, राजा जी हे चित्रपट केले. , आ अब लौट चलें , हम आपके दिल में रहते हैं , चल मेरे भाई , हद कर दी आपने , दुल्हन हम ले जाएंगे , क्यूंकी में झूठ नहीं बोलता , गॉड तुस्सी ग्रेट हो आणि कागज यासारख्या चित्रपटात काम केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com