Hostel Daze 3: राजू श्रीवास्तव यांची अखेरची वेब सिरीज; टीझर प्रदर्शित, चाहते झाले भावूक

राजू श्रीवास्तव यांचे निधन होण्यापूर्वी त्यांचा हा सीझन अखेरचा ठरला.
Hostel Daze 3
Hostel Daze 3Dainik Gomantak
Published on
Updated on

कॅम्पस ड्रामा असलेल्या 'हॉस्टेल डेज' (Hostel Daze 3) या वेब सिरीजचा पहिला आणि दुसरा सीझन प्रेक्षकांनी खूप पंसद केला. ही वेब सिरीज (Web Series) लवकरच नवा सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे दिवंगत अभिनेता राजू श्रीवास्तव (Raju Shrivastav) या वेब सिरीजमध्ये दिसणार आहेत. राजू श्रीवास्तव यांचे निधन होण्यापूर्वी त्यांचा हा सीझन अखेरचा ठरला, त्यामुळे अनेकांना या वेब सिरीजची उत्सुकता लागली आहे. 'हॉस्टेल डेज'चा टीझर प्रदर्शित झाला आहे.

Hostel Daze 3
Ironman 70.3 Goa: रविवारी 'आयर्नमॅन'चा थरार; 70 गोवन ट्रायअ‍ॅथलीटस घेणार सहभाग

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे 21 सप्टेंबर 2022 रोजी हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले. अभिनेता श्रीवास्तव यांचे अकाली निधन झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली. दरम्यान, राजू श्रीवास्तव यांचा अभिनय असलेली त्यांची अखेरची बेव सिरीज पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 'हॉस्टेल डेज' या प्रसिद्ध बेव सिरिजमध्ये रजू श्रीवास्तव यांनी अभिनय केला आहे. या बेव सिरिजचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, टीझर पाहून राजू श्रीवास्तव यांचे चाहते भावूक झाले आहेत.

Hostel Daze 3
Soundarya Sharma अभिनयातील 'डॉक्टर'

टीझरमध्ये राजू श्रीवास्तव चहाच्या दुकानातील विक्रेता किंवा पानवालाच्या भूमिकेत दिसत आहेत. राजू श्रीवास्तव खांद्यावर टॉवेल घेऊन जाताना दिसत आहेत. 'हॉस्टेल डेज' बेव सिरिज अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या भोवती फिरते. प्रेक्षकांना या टीझरला चांगला प्रतिसाद दिला आहे. तर, राजू श्रीवास्तव यांना पाहून चाहते भावूक झाले आहेत. अनेकांनी राजू यांना पाहून आनंद झाला. तर, कही जणांनी राजू श्रीवास्तव यांना मिस करत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com