गोमन्तक डिजिटल टीम
सौंदर्या शर्मा अभिनेत्री असण्यासोबतच एक प्रसिद्ध मॉडेल देखील आहे.
सौंदर्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांपासून वेब सीरिजमध्ये काम केले आहे.
सौंदर्या अभिनेत्री असण्यासोबतच एक डॉक्टर देखील आहे. तिने दंतचिकित्सा विषयात बॅचलर कोर्स केला आहे.
अभिनयात करिअर करण्यापूर्वी सौंदर्याने दिल्लीतील एका हॉस्पिटलमध्ये डेंटिस्ट म्हणून काम केले.
मात्र, या काळात सौंदर्याला अभिनयाला अभिनय क्षेत्रात नशिब आजमविण्याची इच्छा झाली. त्यानंतर ग्लॅमरस जगात आपले करिअर घडवण्यासाठी ती मुंबईत आली.
सौंदर्याने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे प्रशिक्षणही घेतले आहे. अनेक वर्षे तिने संघर्ष केला आणि ऑडिशन दिले.
सौंदर्याने रक्तांचल वेब सीरिजमधून ओटीटीमध्ये पदार्पण केले. सध्या ती बिग बॉस 16 शोमुळे खूप चर्चेत आहे.