Ironman 70.3 Goa: रविवारी 'आयर्नमॅन'चा थरार; 70 गोवन ट्रायअ‍ॅथलीटस घेणार सहभाग

अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूर्ण करावी लागणारी स्पर्धा म्हणून आयर्नमॅन स्पर्धेची ख्याती आहे.
Ironman 70.3 Goa
Ironman 70.3 GoaDainik Gomantak

Ironman 70.3 Goa: जागतिक दर्जाच्या ट्रायथलॉन (Triathlon) स्पर्धेचे येत्या रविवारी (दि.13) गोव्यात आयोजन करण्यात आले आहे. यात 1.9 कि.मी पोहणे, 90 कि.मी सायकल चालवणे आणि 21 कि.मी हाफ मॅरेथॉन असे 113 कि.मी अंतर स्पर्धकांना पार करायचे आहे. यासाठी साडे आठ तासांचा वेळ दिला जातो. ट्रायथलॉन स्पर्धेत देश विदेशातील अनेक स्पर्धेक सहभागी होणार असून, 70 गोवन्स ट्रायअ‍ॅथलीट (Triathletes) सहभाग घेणार आहेत. ही स्पर्धा जिंकणाऱ्या स्पर्धेकाला आयर्नमॅनचा किताब दिला जातो.

(First Ironman 70.3 race scheduled to be held in Panaji On Sunday, November 13)

Ironman 70.3 Goa
Goa festival: साखळीतील ‘वाळवंटी’ काठी भक्तांची दाटी!

स्पर्धेची सुरूवात मिरामार बिच येथील 1.9 कि.मी पोहणे या प्रकारापासून सुरू होणार आहे. दुसरा प्रकार सायकल चालवणे यात मिरामार सर्कलवरून सुरूवात होईल, त्यानंतर दिवजा सर्कल, रायबंदर, मांडवी नदी, बाम्बोळी मैदान असा प्रवास करून पुन्हा मिरामार सर्कलवरून दोना पावला ते पुन्हा मिरामार सर्कलला असा 90 कि.मीचा प्रवास करून परत येतील. तर, शेवटच्या प्रकारात 21 कि.मी हाफ मॅरेथॉन असेल, ज्याचा मार्ग मिरामार सर्कल, दोना पावला, राज भवन असा असेल.

Ironman 70.3 Goa
Crime News: थिवीत आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली

काय आहे 'आयर्नमॅन'

अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूर्ण करावी लागणारी स्पर्धा म्हणून आयर्नमॅन स्पर्धेची ख्याती आहे. या स्पर्धेत शारीरिक क्षमतेचा कस लागतो. जलतरण, सायकलिंग, रनिंग हे प्रकार स्पर्धेत पूर्ण करावे लागतात. क्रीडा विश्वात आयर्नमॅन स्पर्धेला अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक स्पर्धा मानले जाते. अनेक ट्रायअॅथलीट या स्पर्धेत यश मिळवण्यासाठी अपार मेहनत घेत असतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com