Boolywood Latest Movie बॉक्सऑफिसवर दोन सीक्वेल्समध्ये युद्ध; सनीच्या गदर 2 ला अक्षयच्या ओएमजी 2 ची कडवी टक्कर

सनी देओलच्या 'गदर 2' ची अक्षय कुमारच्या 'ओएमजी 2 'शी कडवी टक्कर होत आहे. आगाऊ बुकिंगचे आकडे हेच दर्शवतात की सनी देओलचा चित्रपट थिएटरमध्ये मोठा हिट होणार आहे.
Sunny Deol's 'Gadar 2' compitation with Akshay Kumar's 'OMG 2'
Sunny Deol's 'Gadar 2' compitation with Akshay Kumar's 'OMG 2' Dainik Gomantak
Published on
Updated on

Boolywood Latest Movie: सनी देओलचा 'गदर 2' शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहे. एकीकडे, आगाऊ बुकिंगद्वारे बुधवारी रात्रीपर्यंत चित्रपटाने सुमारे 10 कोटींची कमाई केली असताना, गेल्या 24 तासांत चित्रपटाची 1.10 लाख तिकिटांची विक्री झाली आहे.

Sunny Deol's 'Gadar 2' compitation with Akshay Kumar's 'OMG 2'
Prem Chopra On Rajesh Khanna: 'राजेश खन्नांच्या 'त्या' चुकीसाठी सेटवर एक माणूस रोज मार खायचा' प्रेम चोपडांनी सांगितला रोमांचक किस्सा

22 वर्षांनंतर 'गदर: एक प्रेम कथा'चा हा सिक्वेल चित्रपट आणि सनी देओलच्या कमबॅकबद्दल चाहत्यांचा उत्साह पाहण्यासारखा आहे. दुसरीकडे, अक्षय कुमारचा 'OMG 2' आगाऊ बुकिंगमध्ये फारसा चांगला चालला नाही.

गदर 2 अॅडव्हान्स बुकिंग:

अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर 2' हा बॉक्स ऑफिससाठीचा चित्रपट आहे, या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून सनी देओलच्या हातात हातोडा पाहून प्रेक्षकांची उत्कंठा वाढली होती. sacnilk च्या अहवालानुसार, 'गदर 2' साठी देशभरात बुधवारी रात्रीपर्यंत 3,91,975 तिकिटांची आगाऊ बुकिंग झाली आहे. विशेष म्हणजे यापैकी 1.10 लाख तिकिटांची विक्री बुधवारीच झाली.

गुरुवारपर्यंत 12 कोटींचे आगाऊ बुकिंग अपेक्षित आहे

रिलीज होण्यापूर्वीच आगाऊ बुकिंगमुळे 'गदर 2' ने बुधवारी रात्रीपर्यंत 9.94 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आगाऊ बुकिंगचा वेग गुरुवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पहिल्या दिवसाच्या या आगाऊ बुकिंगमध्ये दिल्ली-एनसीआरमध्ये 38% जागा भरल्या गेल्या आहेत. तर चेन्नई, जयपूरमध्ये हा आकडा 45% पेक्षा जास्त आहे. राजस्थानच्या अलवरमध्ये, 95-100% जागा आगाऊ बुक केल्या गेल्या आहेत, तर यूपीच्या अलीगढमध्ये, सुरुवातीच्या दिवसासाठी सुमारे 70% जागा आधीच भरल्या आहेत.

'गदर 2' पहिल्या दिवशी 40-45 कोटींची कमाई करेल

गदर 2 बॉक्स ऑफिस डे 1: सनी देओल, अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर आणि मनीष वाधवा स्टारर 'गदर 2' देशभरात 3500 हून अधिक स्क्रीन्सवर रिलीज होत आहे. सुमारे तीन तासांच्या या चित्रपटासाठी आगाऊ बुकिंगची स्थिती पाहता हा चित्रपट पहिल्याच दिवशी 40 ते 45 कोटी रुपयांची कमाई करेल असे दिसते. 'गदर 2' पहिल्या वीकेंडमध्ये रविवारपर्यंत 100-110 कोटींचा गल्ला सहज पार करेल.

Sunny Deol's 'Gadar 2' compitation with Akshay Kumar's 'OMG 2'
Amitabh Bachchan KBC 15 Promo: 'पुन्हा भेटू नकोस' केबीसीच्या मंचावरच बिग बींनी स्पर्धकाला दिला इशारा

अक्षयचा 'OMG 2' खराब स्थितीत

OMG 2 Advance Booking: दुसरीकडे, अक्षय कुमारच्या 'OMG 2' ची स्थिती आगाऊ बुकिंगमध्ये फारशी चांगली नाही. sacnilk नुसार बुधवारी रात्रीपर्यंत या चित्रपटासाठी 55,048 तिकिटांचे आगाऊ बुकिंग झाले आहे.

लैंगिक शिक्षणाच्या मुद्द्यावर बनलेल्या या चित्रपटाने 1.68 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटात अरुण गोविलसह पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम यांच्याही भूमिका आहेत. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला 'ए' प्रमाणपत्र दिल्याने बराच गदारोळ झाला होता. पहिल्या दिवशी हा चित्रपट 8 ते 12 कोटी रुपयांची कमाई करत असल्याचे दिसते.

अक्षयचे सलग 5 चित्रपट फ्लॉप झाले आहेत

'गदर 2' बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवसापासून धमाका करणार असताना, 'OMG 2' ला प्रेक्षकांना आकर्षित करावे लागणार आहे. या चित्रपटाची कमाई आता पूर्णपणे 'वर्ड ऑफ माउथ'वर अवलंबून आहे.

जर हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला, तर वीकेंड येईपर्यंत त्याच्या कमाईत जोरदार वाढ होऊ शकते. अक्षय कुमारचे शेवटचे सलग 5 चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले आहेत. अशा स्थितीत त्याला हिटची गरज आहे. त्याच्या आधीच्या 'OMG' चित्रपटाप्रमाणेच 'OMG 2' देखील प्रेक्षकांना आवडेल अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com