Amitabh Bachchan KBC 15 Promo: 'पुन्हा भेटू नकोस' केबीसीच्या मंचावरच बिग बींनी स्पर्धकाला दिला इशारा

Amitabh Bachchan KBC 15 Promo: कौन बनेगा करोडपतीच्या 15 व्या सीझनचे प्रसारण 14 ऑगस्टपासून सोनी टीव्हीवर रात्री 9 वाजता होणार आहे.
Amitabh Bachchan
Amitabh BachchanDainik Gomantak
Published on
Updated on

Amitabh Bachchan KBC 15 Promo: बॉलीवूडच्या बीग बींनी कौन बनेगा करोडपती (केबीसी)च्या मंचावरुन एका स्पर्धकाला आपली पुन्हा भेट होऊ नये म्हटल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. आता चाहत्यां अमिताभ बच्चन यांनी असे का म्हणण्यापाठीमागचे कारण काय असा प्रश्न पडताना दिसत आहे.

कौन बनेगा करोडपती हा भारतातील एक लोकप्रिय टीव्हीवरील कार्यक्रमांपैकी एक आहे. आता हा कौन बनेगा करोडपतीचा १५ वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

केबीसीच्या 15 व्या सीझनचे अनेक एका पाठोपाठ एक प्रोमो आतापर्यंत रिलीज झाले आहेत. नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन आणि स्पर्धक यांच्यातील मजेदार संभाषणाची झलक पाहायला मिळाली आहे. अमिताभ बच्चन आणि आयकर अधिकारी बनू इच्छिणाऱ्या स्पर्धकामधील संभाषणाची चर्चा चांगलीच रंगल्याचे दिसून येत आहे.

परत भेटू नकोस म्हणण्यापाठीमागचे काय आहे कारण

नवीन प्रोमोमध्ये कौन बनेगा करोडपती (KBC 15) सीझन 15 च्या स्पर्धकाची झलक दिसली आहे. प्रोमो व्हिडिओमध्ये स्पर्धक म्हणतो, लोकांचा पहिला टप्पा 10 हजार आहे, पण माझा पहिला टप्पा 80 हजार आहे. कारण मला आयकर अधिकारी व्हायचे आहे आणि त्यासाठी दिल्लीत कोचिंगची व्यवस्था करण्यात आली आहे, ज्याची फी 80 हजार आहे.

अमिताभ बच्चन स्पर्धकाला 80 हजार किंवा त्याहून अधिक जिंकण्यासाठी शुभेच्छा देतात. पुढे ते म्हणतात- तुम्ही इनकम टॅक्स ऑफिसर व्हा पण पुन्हा आपल्या दोघांची कधीही भेट होऊ नये. अमिताभ बच्चन( Amitabh Bachchan ) यांचे हे बोलणे ऐकून स्पर्धकांसह सर्व प्रेक्षकांमध्ये हशा पिकलेला या प्रोमोमध्ये पाहायला मिळतात.

Amitabh Bachchan
Prem Chopra On Rajesh Khanna: 'राजेश खन्नांच्या 'त्या' चुकीसाठी सेटवर एक माणूस रोज मार खायचा' प्रेम चोपडांनी सांगितला रोमांचक किस्सा

कौन बनेगा करोडपतीच्या 15 व्या सीझनचे प्रसारण 14 ऑगस्टपासून सोनी टीव्हीवर रात्री 9 वाजता होणार आहे. यावेळी केबीसीमध्ये अनेक बदल पाहायला मिळतील, ज्यामुळे अमिताभ बच्चनचा शो आणखीनच रंजक होणार असल्याचे म्हटले जात आहे. आता चाहते नव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. यावेळी कोणता स्पर्धक आपल्या ज्ञानाच्या आधारावर किती पैसे जिंकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com