Prem Chopra On Rajesh Khanna: 'राजेश खन्नांच्या 'त्या' चुकीसाठी सेटवर एक माणूस रोज मार खायचा' प्रेम चोपडांनी सांगितला रोमांचक किस्सा

Prem Chopra On Rajesh Khanna: खेदाची गोष्ट म्हणजे बदलत्या परिस्थितीशी हा दिग्गज अभिनेता जुळवून घेऊ शकला नाही.
Prem Chopra On Rajesh Khanna
Prem Chopra On Rajesh KhannaDainik Gomantak
Published on
Updated on

Prem Chopra On Rajesh Khanna: तुम्ही दिग्गज कलाकाराच्या एखाद्या सवयीमुळे कोणालातरी मार खावा लागला आहे, इतर कोणती शिक्षा झाली आहे असा प्रकार कधी पाहिला आहे का? किंवा असा एखादा मजेशीर किस्सा तुम्ही ऐकला आहे का? आता प्रेम चोपडांनी लोकप्रिय कलाकाराच्या एका सवयीमुळे सेटवरच्या माणसाला रोज मार खाण्याचा किस्सा सांगितला आहे.

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांच्यामुळे चित्रपटसृष्टीचा तो काळ ओळखला जातो. असे कलाकार आपल्या भूमिकांसाठी अजरामर होतात. अनेकदा चित्रपट, वक्तव्य आणि वैयक्तिक आयुष्य अशा अनेक कारणांमुळे हे कलाकार मोठ्या चर्चेत असतात.

आपल्या नकारात्मक भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रेम चोपडा यांनी आपल्या नुकत्याच मुलाखतीत राजेश खन्ना यांच्याबाबतचा एक किस्सा शेअर केला आहे. 'हाथी मेरे साथी' या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यानचा हा किस्सा आहे.

  • राजेश खन्ना यांच्या चूकीसाठी तो माणूस रोज मार खायचा

प्रेम चोपडा 'हाथी मेरे साथी' या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यानची आठवण सांगताना म्हणतात, 'या चित्रपटाचे शुटिंग चेन्नईमध्ये चालू होते. चेन्नई( Chennai )मधील लोक वेळ पाळण्यासाठी पाबंद असतात. जर तुमचे शूट 9 ला सुरु करणार असतील तर हे लोक सेटवर 8.30 ला पोहचतात. मात्र राजेश खन्ना यांना लेट यायची सवय होती. ते सकाळच्या शूटसाठी दुपारी यायचे.

राजेश खन्ना यांचा दरारा इतका होता की त्यांना कोणी त्यांच्या उशीरा येण्याबद्दल बोलू शकत नसे. मात्र त्यांच्या हे लक्षात येणे गरजेचे असल्याने आणि त्यांच्या या सवयीला कंटाळून एका निर्मात्याने एक आयडिया केली होती. त्यांनी सेटवर असा एक माणूस कामासाठी ठेवला होता, जो राजेश खन्ना ज्या-ज्यावेळी लेट यायचे तेव्हा हा माणूस मार खायचा. हळूहळू राजेश खन्ना यांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी वेळेवर सेट वर यायला सुरुवात केली.'

Prem Chopra On Rajesh Khanna
Happy Birthday Shabir Ahluwalia: 'कयामत' ते 'कुमकुम भाग्य' पर्यंत शब्बीरचा प्रवास

प्रेम चोपडा पुढे म्हणतात, जेव्हा ते दुपारी सेटवर यायचे तेव्हा त्यांना विचारले जायचे की, ते जेवणार आहेत का?पण चांगली गोष्ट ही होती की राजेश खन्ना पहिल्यांदा काम पूर्ण करायाचे.

  • राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांची केली तुलना

हा तो काळ होता जेव्हा राजेश खन्नांचा स्टारडम मोठा होता. राजेश खन्नाच्या स्टारडमची कल्पना सिनेजगतातच केली जाऊ शकते, जेव्हा चाहते राजेश खन्नांची एक झलक पाहण्यासाठी थंडीत ब्लँकेट घेऊन रस्त्यावर बसायचे. राजेश खन्नांची तब्येत बिघडली की स्वतः चित्रपट निर्माते त्यांना रुग्णालयात दाखल करायचे. पण वेळ कुठेच थांबत नाही.

अमिताभ बच्चन सारख्या नवीन स्टार्सचे इंडस्ट्रीत आगमन आणि सततचे फ्लॉप चित्रपट यामुळे राजेश खन्ना यांच्या स्टारडमचा आलेख घसरायला लागला. खेदाची गोष्ट म्हणजे बदलत्या परिस्थितीशी हा दिग्गज अभिनेता जुळवून घेऊ शकला नाही. याउलट अमिताभ बच्चन यांनी बदलत्या काळानुसार स्वत:ला बदलले आणि आजदेखील ते पूर्वीपेक्षा व्यस्त आहेत याचे मला आश्चर्य वाटते असेही प्रेम चोपडा यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com