Suniel Shetty : "मी त्यांना शिव्या द्यायचो, पोलिस म्हणायचे वेडा आहेस का"? सुनिल शेट्टीने सांगितला अंडरवर्ल्डच्या धमक्यांचा किस्सा..

अभिनेता सुनिल शेट्टीने त्याला अंडरवर्ल्डकडून मिळणाऱ्या धमक्यांचा किस्सा सांगितला आहे.
Suniel Shetty
Suniel Shetty Dainik Gomantak
Published on
Updated on

बॉलीवूडचा अण्णा अर्थात सुनिल शेट्टी हा कधीच कुठल्या वादग्रस्त प्रकरणात अडकला नाही. आजवर सुनिल अण्णांचा कधी कुणाशी वादही नाही झाला ;पण आज आम्ही तुम्हाला अण्णाच्या आयुष्यातला एक वादग्रस्त किस्सा सांगणार आहोत जो तुम्ही कधीच नाही ऐकला.

बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीने अलीकडेच खुलासा केला की त्याला 90 च्या दशकात अंडरवर्ल्डमधून कॉल येत होते. पण, घाबरलेल्या बहुतेक लोकांसारखा सुनिस शेट्टीने शांत रिप्लाय दिला नाही . सुनील शेट्टीने त्यांना सरळ सरळ शिव्याच दिल्या.

अण्णा पॉडकास्टवर

'द बार्बरशॉप विथ शंतनू ' या पॉडकास्टवर बोलताना सुनील म्हणाला की, मुंबईत अंडरवर्ल्ड भरभराटीला आलेला होता. “तुला माहित आहे 'मी हे करेन, मी ते करेन' असे मला फोन यायचे. यावेळी मी परत शिव्या द्यायचो. मला पोलिस म्हणाले, 'ऐका, तू वेडा आहेस. तुला समजत नाही, ते नाराज होतील आणि ते काहीही करू शकतात.' मी म्हणालो,यात माझी चूक नाही, माझे रक्षण मी करू शकतो .

बालपणीच्या आठवणी

सुनीलने त्याच्या लहानपणी केलेल्या काही विलक्षण गोष्टी श्रोत्यांसोबत शेअर केल्या. तो जखमी झाला, संकटातून बाहेर पडला आणि स्वत: बरा झाला, त्याने आपल्या मुलांना, अथिया आणि अहानला , त्याच्यासोबत काय घडले हे कधीही सांगितले नाही. सुनील शेट्टीच्या मते, “वेळ हा सर्वोत्कृष्ट उपचार करणारा महत्त्वाचा घटक आहे” जेव्हा त्याने

वडिलांची आठवण..

सुनीलला अंडरवर्ल्डशी कसे झगडावे लागले याचा किस्सा सांगितलाच पण तो आपल्या भूतकाळाबद्दलही बोलला,. आपल्या मुलांचे बालपण चांगलं जावं ती चांगली ठिकाणी वाढावीत यासाठी त्याच्या वडिलांनी केलेल्या संघर्षांबद्दलही तो स्पष्टपणे बोलला. 

सुनील म्हणतो की, त्याच्या वडिलांनी भीक मागितली, कर्ज घेतले आणि जवळपास चोरी करून कुटुंबाला मुंबईतील एका कुप्रसिद्ध वस्तीपासून दूर नेले. 

Suniel Shetty
Uorfi Javed Supports Wrestlers: "कुणाला खोटं ठरवण्यासाठी इतकं खाली जाऊ नये" कुस्तीपटूंना उर्फी जावेदचा पाठिंबा..

या पॉडकास्टमध्य़े बोलताना सुनील म्हणाला, “मी असे म्हणणार नाही की ते एक कुप्रसिद्ध ठिकाण आहे, परंतु तेथे टोळ्या होत्या आणि तशाच बाकीच्या गोष्टी होत्या. आणि जरी हे त्याच्या व्यवसायासाठी एक उत्तम ठिकाण असले तरी, मुलांनी या क्षेत्रात यावे अशी त्याची इच्छा नव्हती,

'जर मी त्यांना या क्षेत्रात एका विशिष्ट वयात येण्याची परवानगी दिली, तर कदाचित त्याचा परिणाम त्यांच्यावर होईल. माझ्या वडिलांनी विचार केला.' त्याने भीक मागितली, कर्ज घेतले आणि "उत्तम संस्कृती, चांगल्या शाळा, चांगले लोक" असलेल्या ठिकाणी आपल्या कुटूंबाला हलवले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com