Uorfi Javed Supports Wrestlers: "कुणाला खोटं ठरवण्यासाठी इतकं खाली जाऊ नये" कुस्तीपटूंना उर्फी जावेदचा पाठिंबा..

लैंगिक शोषणाचा आरोप करत दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना आता उर्फी जावेदने पाठिंबा दिला आहे.
Uorfi Javed supports wrestlers
Uorfi Javed supports wrestlersDainik Gomantak
Published on
Updated on

Uorfi Javed Supports Wrestlers: कालच्या दिवशी दोन महत्त्वाच्या गोष्टी सोशल मिडीया माध्यमातून चर्चेत आल्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल (28 मे) नवीन संसद भवन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

त्याचवेळी दुसरीकडे लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या कुस्तीपटूंचे फोटो आणि व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. दरम्यान कुस्तीपटू साक्षी मलिक आणि तिचा पती सत्यव्रत कादियान यांना बसमधून ताब्यात घेण्यात आले.

हे खेळाडू जंतरमंतरवर उपस्थित होते आणि तेथून ते नव्या संसदेच्या दिशेने जात होते. सर्वांना जंतरमंतरवर थांबवण्यात आले आहे. यावेळी आंदोलन करत असलेल्या भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंना पोलीस फरफटत, ओढत नेले.

सोशल मिडीयावर फोटो व्हिडीओ व्हायरल

या घटनेचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरलही झाले. अनेक स्तरातुन या घटनेची निंदा केली.

दरम्यान या आंदोलनासदर्भात सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल होत आहे ज्यामध्ये विनेश आणि संगीता फोगट बसमध्ये बसलेले आहेत. यादरम्यान, दोन फोटोंचा कोलाज आहे ज्यात एका फोटोत ते गंभीर आहे तर दुसऱ्या फोटोत ते हसताना दिसत आहे.

उर्फी कुस्तीपटूंसाठी मैदानात

आता हा फोटो शेयर करत उर्फी जावेद जी मनोरंजन विश्वातलं चर्चेतलं नाव आहे तिनेही सरकारवर ताशेरे ओढले आहे. उर्फी ही तिच्या फॅशनबरोबरच तिच्या परखड वक्तव्यासाठी ओळखली जाते. तिने आता हा फोटो शेयर करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.

फोटो शेअर करताना उर्फीने लिहिले 'आपले खोटेपणा सिद्ध करण्यासाठी लोक असे फोटो का एडिट करतात! एखाद्याला चुकीचे सिद्ध करण्यासाठी इतकं पातळी सोडून वागू नये की खोट्या गोष्टीची मदत घ्यावी लागेल.'

आता उर्फीने ही पोस्ट व्हायरल झाली आहे. नेटकरी तिच्या पोस्टवरही अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे तर काहीजण तिला योग्य गोष्टीवर व्यक्त हो्ण्यासाठी तिला पाठिंबा देत आहे.

Uorfi Javed supports wrestlers
HBD Pankaj Kapoor : अभिनयाच्या अनेक छटा दाखवणारा जादूगार...पंकज कपूर

केवळ उर्फीच नव्हे तर अनेक कलाकारांनी या घटनेचा निषेध केला आणि हे अत्यंत चुकीचं असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, यात स्वरा भास्कर, उर्मिला मातोंडकर यांचाही सामावेश आहे.

यावेळी स्वराने मोदी सरकारवर अप्रत्यक्ष टिका केलीय. स्वराने मोदी सरकारचा एक फोटो पोस्ट केला. यात ऐकीकडे अनेक साधूबाबांसोबत मोदी उभे आहेत तर दुसरीकडे भारतीय कुस्तीपटू महिला दिसून येत आहेत. हा फोटो कोलाज करून स्वराने सरकारच्या भूमीकेतला विरोधाभास दाखवला आहे. स्वरा लिहिते.. या गोष्टींसीठी आपण मतदान केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com