रोमान्स, सस्पेन्स आणि मर्डर मिस्ट्री... अनुपमा नंतर आता स्टार प्लसची ही भन्नाट सिरीयल लवकरच...

'अनुपमा' या सिरीयलला प्रेक्षकांकडून मिळालेल्या भरगोस प्रतिसादानंतर आता स्टार प्लस नवी सिरीयल रिलीज करत आहेत
Keh Doon Tumhein
Keh Doon TumheinDainik Gomantak
Published on
Updated on

Star Plus new Serial: स्टार प्लसच्या सिरीयल्स टेलिव्हिजन इंडस्ट्रीत प्रचंड टीआरपी मिळवण्यासाठी ओळखल्या जातात. चॅनेलने आजवर प्रसारित केलेल्या जवळपास सगळ्या सिरीयल्सना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

अनुपमा या सिरियलने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं. या सिरीयलच्या यशानंतर आता स्टार प्लसची नवी सिरीयल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

रोमान्स, सस्पेन्स आणि मर्डर मिस्ट्री

रोमान्स, सस्पेन्स आणि मर्डर मिस्ट्री यावर आधारित 'कह दूं तुम्हे' हा नवीन शो लवकरच स्टार प्लसवर सुरू होणार आहे. या शोची पार्श्वभूमी पाचगणीच्या आसपासच्या हत्येच्या रहस्यावर आधारित आहे. नुकताच या शोच्या निर्मात्यांनी प्रोमो रिलीज केला आहे. प्रोमो पाहुन सिरीयलचा जॉनर पटकन लक्षात येऊ शकतो. 

'कह दूं तुम्हे' हा स्टार प्लसवर सुरू होणारा नवा शो एक मर्डर मिस्ट्री शो आहे जो प्रेमकथेवर आधारित आहे. स्टार प्लसवर अशा प्रकारची रोमान्स, सस्पेन्स आणि मर्डर मिस्ट्री मालिका याआधी कधीच आली नव्हती. या शोमध्ये युक्ती कपूर आणि मुदित नायर प्रमुख भूमिकेत आहेत.

प्रोमो रिलीज

नुकताच 'कह दू तुम्हे' चा प्रोमो निर्मात्यांनी रिलीज केला आहे. या शोमध्ये युक्ती कपूर कीर्तीची भूमिका साकारत असून मुदित नायर विक्रांतची भूमिका साकारत आहे. प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की कीर्तीची कार खराब होते, त्यामुळे विक्रम कीर्तीला लिफ्ट देतो. 

कीर्ती सांगते की ती एकटी आई आहे आणि तिच्या पतीपासून वेगळी राहत आहे. विक्रांत कीर्तीला पाचगणी येथे ड्रॉप करतो. प्रोमोमध्ये विक्रांत आणि कीर्तीची वाढती जवळीक दाखवण्यात आली आहे.

टर्निंग पॉईंट

कथेतील टर्निंग पॉइंट तेव्हा येतो जेव्हा विक्रांतच्या कारमध्ये एका महिलेचा मृतदेह दिसतो, ज्याची कीर्तीला माहिती नसते. जेव्हा तिला तिच्या पिशवीवर रक्त दिसते तेव्हा विक्रांत तिला टोमॅटो केचपचं कारण सांगतो शांत करतो.

आता हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे की कीर्ती या हत्येचे रहस्य उलगडू शकते की नाही, या कथेतील विक्रांत आणि कीर्तीच्या बाबतीतले पुढील ट्विस्ट काय असेल?

Keh Doon Tumhein
'सलमान'च्या त्या प्रकरणामुळे त्याच्यासोबत केलेला ये है जलवा चित्रपट फ्लॉप झाला, अमिशाची खंत...

4 सप्टेंबरपासुन होणार प्रसारित

स्टार प्लस 'अनुपमा', 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'गम है किसी के प्यार में' यांसारख्या कौटुंबिक सिरीयल्ससाठी ओळखले जाते. 'कह दूं तुम्हे' हा स्टार प्लसचा असाच एक शो आहे, ज्यामध्ये रोमान्स, सस्पेन्स आणि मर्डर मिस्ट्री यांचा समावेश पाहायला मिळणार आहे. 4 सप्टेंबरपासून हा शो स्टार प्लसवर सोमवार ते रविवार रात्री 11 वाजता प्रसारित होणार आहे.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com