Ameesha Patel explains why the movie Yeh Hai Jalwa flopped : सध्या सनी देओल आणि अमिशा पटेल यांच्या मुख्य भूमीका असणारा गदर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 400 कोटींचा टप्पा गाठुन प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे.
गदर फेम अभिनेत्री अमिशा पटेल सध्या या चित्रपटासोबतच तिने दिलेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलचा 2002 साली सलमान खानसोबतचा चित्रपट आला होता, ज्याचे नाव होते 'ये है जलवा'.
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही आणि फ्लॉप झाला. आता 'गदर 2' ची सकीना आपल्या अपयशाबद्दल बोलते. ये है जलवा का फ्लॉप झाला याचं कारण आता स्वत: अमिशानेच सांगितलं आहे.
अमिषा पटेलच्या फिल्मी कारकिर्दीवर नजर टाकली तर तुम्हाला त्यातले कोणते चित्रपट आठवतील? आधी मग 'कहो ना..प्यार है 'गदर', ' आणि 'हमराझ' ही नावं प्रामुख्याने सांगता येतील. अमिशाने केलेले बरेच चित्रपट चालले देखील.
या सिनेमांमधून लोकांनी अमिशाला पसंत केले आणि आजही ते करत आहेत. एका मुलाखतीत अमिशाने सलमान खानच्या 'ये है जलवा' या चित्रपटाबद्दल सांगितले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा गल्ला जमवू शकला नाही, आणि याचं कारण सलमानचं एक प्रकरण असल्याचं अमिशा म्हणाली. चला पाहुया अमिशा नेमकं काय म्हणाली?
गदर: एक प्रेम कथा 2001 मध्ये प्रदर्शित झाला, हा चित्रपट ब्लॉकबस्टर होता. त्याच वेळी, जेव्हा ती 2002 मध्ये सलमान खान सोबत 'ये है जलवा' मध्ये दिसली तेव्हा तो चित्रपट मोठ फ्लॉप ठरला.
या चित्रपटाच्या अपयशाविषयी बोलताना अमिषा पटेलने 'बॉलिवूड हंगामा'ला सांगितले की, या चित्रपटाने आणखी चांगली कामगिरी करायला हवी होती. त्याच वर्षी सलमान खानने हिट-अँड-रन प्रकरणामुळे गदारोळामुळे चित्रपटाकडे लक्ष दिले गेले नाही.
अमिषा म्हणाली, 'ये है जलवा हा डेव्हिड धवनच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक होता. सलमान याआधी इतका देखणा कधीच दिसला नव्हता आणि सर्व काही चांगले होते ;पण मला वाटतं कदाचित मीडियाने आधी बातम्या कव्हर केल्या असतील, त्यामुळे प्रेक्षक त्यांच्या आवडत्या अभिनेत्यांबद्दल काहीतरी नकारात्मक ऐकून नाखुश झाले.
सलमानसोबचं हिट अँड रन प्रकरण नुकतंच घडलं होतं, त्यामुळे ये है जलवा बाजूला करण्यात आला होता. प्रेक्षकांना याची जाणीव असती तर.. हा चित्रपट खरोखरच चांगला झाला असता.'
'ये है जलवा' 3 जुलै 2002 रोजी रिलीज झाला होता. तर, 28 सप्टेंबर 2002 रोजी मुंबईतील बेकरीमध्ये कार आदळल्यानंतर सलमानला रॅश ड्रायव्हिंग केल्याबद्दल अटक करण्यात आली होती.
या घटनेत बेकरीबाहेरील फूटपाथवर झोपलेल्या एकाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. सुरुवातीला, अभिनेत्यावर निर्दोष हत्येचे आरोप लावण्यात आले होते. मात्र, नंतर हा आरोप फेटाळण्यात आला.