Taapsee Pannu New Film: समंथा रुथ प्रभू अन् तापसी पन्नूच्या एकत्र झळकणार रूपेरी पडद्यावर

Taapsee Pannu New Project: दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि तापसी पन्नू नवीन प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहे.
Taapsee Pannu New Film
Taapsee Pannu New FilmInstagram
Published on
Updated on

बॉलिवूडमधील प्रसिद्द अभिनेत्री तापसी पन्नू सध्या सृजित मुखर्जी (Srijit Mukherji) दिग्दर्शित ‘शाबाश मिठू’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये तापसी क्रिकेटर मिताली राजच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या तापसी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडे, 'शाबाश मिठू' च्या प्रमोशन दरम्यान, तिने आगामी प्रोजेक्ट्सबद्दल खुलासा केला आहे. (Taapsee Pannu New Project News)

पिंकविलाशी झालेल्या संवादात तापसीने सांगितले की, ती साउथ क्वीन सामंथा रुथ प्रभूसोबत (Samantha Ruth Prabhu) काम करणार आहे. तापसीने सांगितले की ती एका चित्रपटाची निर्मिती करत आहे. ज्यामध्ये सामंथा मुख्य भूमिका साकारणार आहे. लवकरच त्यांची अधिकृत घोषणाही करण्यात येणार असल्याचे तापसीने (Taapsee Pannu) सांगितले.

तापसी म्हणाली- 'असे काहीतरी आहे ज्यावर मी आणि समंथा एकत्र काम करत आहोत. आम्ही लवकरच त्याची घोषणा करू. पण हो हे निश्चित झाले आहे, की समंथा आणि मी एकत्र एका प्रोजेक्टवर काम करत आहोत. मी त्याची निर्मिती करत आहे. याशिवाय माझ्या मते चित्रपटात काही भाग असेल तर तेही मी करू शकतो. पण यात सामंथा लीड रोलमध्ये आहे. मी या प्रकल्पाबद्दल खूप उत्सुक आहे.

याशिवाय तापसीने 'वायकॉम 18' (Viacom 18) स्टुडिओसोबत तिच्या निर्मिती उपक्रमात बनवल्या जाणार्‍या 'धक धक' चित्रपटाबद्दलही बोलली. या चित्रपटात रत्ना पाठक, दिया मिर्झा, फातिमा सना शेख आणि संजना सांघी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तापसी म्हणाली की, घाईगडबडीतही ती खूप उत्साहित आहे. ती म्हणते- 'धक धक'ची कॉलशीट, फोटो आणि लोकेशन फोटो-व्हिडिओ पाहिल्यावर मी लहान मुलासारखी उत्तेजित होते.'

तपसी पन्नूचा शाबाश मिठू हा क्रिकेटर मिताली राजचा (Mithali Raj) बायोपिक आहे. हा चित्रपट 15 जुलै 2022 रोजी रिलीज होणार आहे. यानंतर तापसी 'ब्लर' आणि 'वो लड़की है कहाँ' सारख्या चित्रपटांमध्ये (Movie) दिसणार आहे. दुसरीकडे, तापसी पन्नू शाहरुख खानच्या 'डंकी'मध्ये देखील दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com