Viral Video: गाडीच्या छतावर बसून सुपरस्टार पवन कल्याण पोहोचला गावकऱ्यांचे सांत्वन करायला

व्हिडिओसह पवनचे गावकऱ्यांसोबतचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Pawan Kalyan
Pawan Kalyan Dainik Gomantak

Pawan Kalyan Viral Media: तेलुगू सिनेसृष्टीतील सुपरस्टार आणि राजकारणी पवन कल्याण (Pawan Kalyan) सध्या त्याच्या एका व्हिडिओमुळे खूप चर्चेत आहे. व्हिडिओमध्ये जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण हे एसयूव्हीच्या छतावर बसलेले दिसत आहेत. व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल की हा चित्रपटाच्या शूटिंगचा आहे, पण तसे नाही. हा व्हिडिओ तेव्हाचा आहे जेव्हा पवन गुंटूर जिल्ह्यातील इप्पटम गावाला भेट देणार होते तेव्हाचा आहे.

Pawan Kalyan
Viral Video: पाच वर्षानंतर टांझानियात मोठा विमान अपघात; 49 प्रवासी होते विमानात

इप्पटम गावात रस्ता रुंद करण्यासाठी घरे पाडण्यात आली. ज्यांची घरे पाडण्यात आली त्याच लोकांना भेटण्यासाठी पवन कल्याण इप्पटमला पोहोचला होता. यावेळी त्यांनी तेथील लोकांची भेट घेतली. व्हिडिओसह पवनचे गावकऱ्यांसोबतचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पवन कल्याणचे चाहते त्याला लोकनेता म्हणत आहेत. व्हिडीओ शेअर करताना डॉ. शिव प्रसाद रेड्डी नावाच्या एका युजरने असे लिहिले की, "हे थोडं विचित्र वाटत आहे, पण असा स्वॅग आणि अॅटिट्यूड तोही स्क्रीनच्या बाहेर."

Pawan Kalyan
Andheri By Election Results: ऋतुजा लटके यांचा 53 हजार 471 मताधिक्याने विजय

काही लोक गावकऱ्यांना भेटून पवनचे कौतुक करत आहेत, तर अनेक युजर्स पवनवर अशा प्रकारे गाडीच्या छतावर बसल्याबद्दल टीका करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com