Viral Video: पाच वर्षानंतर टांझानियात मोठा विमान अपघात; 49 प्रवासी होते विमानात

बुकोबा विमानतळापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर हा विमान अपघात झाला.
Plane crashes into Lake Victoria in Tanzania
Plane crashes into Lake Victoria in TanzaniaDainik Gomantak

Plane crashes in Tanzania: टांझानियातील व्हिक्टोरिया (Lake Victoria in Tanzania) सरोवरात रविवारी विमान कोसळून मोठा अपघात झाला. या विमानात 49 प्रवासी होते, अपघातानंतर विमानातील 23 प्रवाशांची सुटका करण्यात यश आले असून, उर्वरित प्रवाशांची सुटका करण्यासाठी बचावकार्य सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Plane crashes into Lake Victoria in Tanzania
T20 WC: हुश्श! पोहचलो एकदाचे सेमी फायनलमध्ये; अखेर पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र

टांझानिया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे विमान तलावात कोसळले. हे विमान वायव्येतील शहर बुकोबा (Bukoba Airport) येथे उतरणार होते, त्याच दरम्यान हा अपघात झाला. पाच वर्षांपूर्वी उत्तर टांझानियामध्ये अशीच एक घटना घडली होती. ज्यात सफारी कंपनीचे विमान कोसळून, 11 जणांचा मृत्यू झाला होता.

Plane crashes into Lake Victoria in Tanzania
USA: अहो अश्चर्यम! 56 वर्षीय महिलेने सून आणि मुलाच्या बाळाला दिला जन्म

टांझानिया येथील हा विमान अपघात बुकोबा विमानतळापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर झाला. हे विमान टांझानियामधील सर्वात मोठी खाजगी विमान कंपनी प्रिसिजन एअर कंपनीचे आहे. अपघातानंतर कंपनीने निवेदन जारी करून बचाव पथकाला घटनास्थळी पाठवले आहे. पुढील दोन तासांत अधिक माहिती जाहीर केली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com