Andheri By Election Results: ऋतुजा लटके यांचा 53 हजार 471 मताधिक्याने विजय

टाला 12 हजार 776 मते पडली आहेत.
Andheri By Election Results
Andheri By Election ResultsDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर सर्व राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या अंधेरी पूर्व निवडणुकीत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटकेंचा (Rutuja Latake) विजय झाला आहे. एकोणीसाव्या फेरीनंतर ऋतुजा लटके 53 हजार 471 मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. त्यांना एकूण 66 हजार 247 मते पडली, तर नोटाला 12 हजार 776 मते पडली. पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेऱ्यांपर्यंत लटके या आघडीवर होत्या.

Andheri By Election Results
T20 WC: हुश्श! पोहचलो एकदाचे सेमी फायनलमध्ये; अखेर पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र

रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्वच्या जागेसाठी 3 नोव्हेंबरला मतदान पार पडलं. या निवडणुकीत दिवंगत लटके यांच्या पत्नी आणि ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्यासह सात अपक्ष उमेदवार रिंगणात होते. नोव्हेंबरला यासाठी 31.74 टक्के मतदान झालं. याची मतमोजणी आज पार पडली त्यात, ऋतुजा लटके यांना 66 हजार 247 मतं मिळाली आहेत. त्यानंतर दोन नंबरची सर्वाधिक मते नोटाला मिळाली आहेत. नोटाला 12,776 मतं मिळाली आहेत.

Andheri By Election Results
Business News: शेणाचं सोनं! जयपूरचा उद्योजक शेणाच्या उत्पादनांमधून कमावतोय करोडो रुपये

दरम्यान, अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतील विजयाचा जल्लोष आम्ही करणार नाही. अंधेरी पोटनिवडणूक माझ्या पतीच्या दुर्दैवी घटनेनंतर लागली. अशा शब्दांत ऋतुजा लटके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच, पोटनिवडणुकीतून भाजपकडून जरी उमेदवार मागे घेतला असला तरी त्यांच्याकडून लोकांना नोटापुढचे बटण दाबण्याबाबत सांगण्यात आले, त्याबाबतचे व्हिडिओही सोशल मीडियातून व्हायरल झाले आहेत, असा आरोपही लटके यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com