South Film Industry : आता साऊथ इंडस्ट्रीने पुन्हा चूक केली तर मिळवलेलं सगळं जाईल अशी भिती व्यक्त होतेय..

मोठ्या प्रयत्नाने मिळवलेलं नाव साऊथ इंडस्ट्री या चुकीमुळे गमावू शकते
South Film Industry
South Film Industry Dainik Gomantak
Published on
Updated on

गेल्या काही काळात साऊथ फिल्म इंडस्ट्रीने आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. एकेकाळी दक्षिणेच्या चित्रपटांना गौण समजलं जायचं ;पण अलीकडच्या चित्रपटांनी श्रीकांत ओडेला दिग्दर्शित 'दसरा' (दसरा) चित्रपटाचा टीझर तेलुगू, हिंदू, कन्नड, तमिळ आणि मल्याळममध्ये प्रदर्शित झाला आहे. 

हा टिझर पाहिल्यावर साऊथचे सगळे चित्रपट डोळ्यांसमोर तरळू लागले. आता बॉलीवूडसारखीच चूक होऊ लागली आहे, ज्याचे नुकसान खूप मोठे होईल, असे वाटत होते.

2020 मध्ये, कोरोना महामारी पसरली, त्यानंतर लॉकडाऊन लागू करण्यात आला. 21 दिवसांपासून सुरू झालेल्या या लॉकडाऊनने वर्षभर लोकांना घरी बसवले. त्याचा प्रादुर्भाव इतका होता की त्याचा परिणाम बॉलिवूडवरही झाला. यावेळी चित्रपटांनी आपले स्वरूप बदलले.

 जेव्हा चित्रपटगृहे उघडली तेव्हा बॉलीवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर उद्ध्वस्त झाले होते. या तोट्याचाही फायदा झाला तो फक्त साऊथ फिल्म इंडस्ट्रीला. दोन वर्षांत या साऊथच्या सिनेमाने देशभर पाय रोवले. लोक तिथल्या चित्रपटांना दाद देऊ लागले. पण इथुनपुढचा यशाचा प्रवास कठीण असणार आहे

हा मुद्दा आता 'दसरा'चा टीझर पाहिल्यावर आता साऊथही बॉलीवूडच्या वाटेवर गेली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे . साऊथचा सिनेमा बॉलिवूडने केलेली चूक करतोय.. श्रीकांत ओडेला दिग्दर्शित आणि नानी, कीर्ती सुरेश, साई कुमार, शाइन टॉम चाको स्टारर रिव्हेंज थ्रिलर 'दसरा' (दसरा) चा टीझर 30 जानेवारी रोजी रिलीज झाला.

 30 मार्च रोजी तेलुगू, हिंदू, कन्नड, तामिळ आणि मल्याळममध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट, त्या सर्व चित्रपटांचे एक रूप असल्याचे दिसते, जे आतापर्यंत साऊथ इंडस्ट्रीचे सुपरहिट ठरले आहेत. 

केजीएफ असो की पुष्पा किंवा कांतारा. या इंडस्ट्रीचे चित्रपट वेगळे आहेत यात शंका नाही. कथा, संकल्पना सर्व नवीन आहेत. काहीही शिळे होत नाही. पण दसऱ्याची झलक पाहिल्यानंतर आपण काही नवीन पाहतो आहोत असे वाटले नाही. त्याऐवजी फक्त रॉकी भाई आणि पुष्पा राज दिसले.

वीरलापल्ली गावात विणलेला, 'दसरा' ही एका मुलाची कथा आहे जो आपल्या गावाचा डॉन आहे किंवा आपल्या लोकांसाठी मशीहा आहे. 

संपूर्ण टीझरमध्ये नानीचा लूक पुष्पासारखाच आहे. तसेच केस, दाढी आणि तोंडात विडी. शिवाय अर्ध्या पायाची तीच लुंगी आणि तीच कृती. अशा परिस्थितीत आता साऊथ इंडस्ट्रीही आपल्या चित्रपटांमध्ये तोचतोच कंटेंट मांडत असल्याचं दिसतं. 

बॉलिवूडने केलेली चुक आता साऊथची इंडस्ट्री करतेय असच म्हणावं लागेल. मोठ्या प्रयत्नाने दाक्षिणात्य सिनेमाने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण पुन्हा एकदा हाच लूक आणि स्टाईल प्रेक्षक स्वीकारणार का? हा महत्वाचा प्रश्न आहे.

South Film Industry
HBD Preity Zinta: वयाच्या १३व्या वर्षी वडिलांचा मृत्यू, अंडरवर्ल्डकडून धमक्या, जोडीदाराकडून मानसिक छळ...

वास्तविक, तुम्ही रोज एकच गोष्ट खाऊ शकत नाही किंवा तुम्ही तेच तेच जुने मॉडेल विकू शकत नाही. लोकांना नवीन हवं असतं . तोच गरीब मुलगा आणि गावाचा मसिहा बनून गुंडांशी त्याची लढाई बघून लोकांना आता अशा गोष्टीची सवय झाली आहे. दिग्दर्शकांनी आता हे सर्व दाखवणे बंद करावे. आता लोकांना काहीतरी वेगळे बघायचे आहे. 

पुष्पा, केजीएफ, कांतारा या चित्रपटांची वेगळी होती म्हणूनच ती खूप लोकप्रिय झाली. पण जर तुम्ही तिच खिचडी पुन्हा सर्व्ह केली तर तिला चालेल असे वाटत नाही

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com