HBD Preity Zinta: वयाच्या १३व्या वर्षी वडिलांचा मृत्यू, अंडरवर्ल्डकडून धमक्या, जोडीदाराकडून मानसिक छळ...

बॉलिवूडला आपल्या सौंदर्याने घायाळ करणाऱ्या प्रिती झिंटाचा आज वाढदिवस...
HBD Preity Zinta
HBD Preity ZintaDainik Gomantak
Published on
Updated on

प्रीती झिंटा आज तिचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. यावेळी ती तिच्या वाढदिवसानिमित्त दुबईला भेट देण्यासाठी गेली आहे. प्रीती झिंटाने भलेही फिल्मी दुनियेपासून आता बरीच दूर गेली आहे

ती सध्या चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरी तिची लोकप्रियता कमी झाली नाही. आजही चाहत्यांना त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. प्रिती झिंटाने चित्रपटसृष्टीत आपल्या कामातून एक वेगळी ओळख निर्माण केली. 

2000 च्या दशकात तिची गणना बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींमध्ये केली जात होती. आज प्रीती (Preity Zinta) झिंटाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला तिच्या आयुष्याशी संबंधित अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्यांच्याबद्दल तुम्ही याआधी कधीच ऐकले नसेल. 

'डिंपल क्वीन' प्रीती झिंटाचा जन्म 31 जानेवारी 1975 रोजी हिमाचल प्रदेशातील शिमला येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दुर्गानंद झिंटा होते, ते भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून कार्यरत होते. आणि त्यांच्या आईचे नाव निलप्रभा झिंटा आहे. प्रीती १३ वर्षांची असताना तिच्या वडिलांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. या अपघातात प्रितीची आईही गंभीर जखमी झाली आणि त्यांना बराच वेळ बेड रेस्टवर राहावे लागले. 

HBD Preity Zinta
Kapil Sharma : कपिल शर्मा: अभिनयानंतर आता कपिल गाणार, गुरू रंधावासोबत करणार काम...

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रीती मुंबईत आली. यापूर्वी त्यांनी एका टीव्ही जाहिरातीत काम केले होते. यादरम्यान त्यांची शेखर कपूरशी भेट झाली. शेखरला प्रिती झिंटा आणि हृतिक रोशनसोबत 'तारा रम पम पम' हा चित्रपट बनवायचा होता, पण हा चित्रपट रद्द झाला. शेखरने त्याचा मित्र मणिरत्नमला प्रितीला 'दिल से' चित्रपटात कास्ट करण्यास सांगितले आणि त्यांनी होकार दिला. 

या चित्रपटातील त्यांची भूमिका केवळ 20 मिनिटांची होती, मात्र छोट्या भूमिकेत तिने आपले अभिनय कौशल्य दाखवले. प्रीतीला खरी ओळख 1998 साली आलेल्या 'सोल्जर' चित्रपटातून मिळाली होती, ज्यामध्ये ती बॉबी देओलसोबत दिसली होती. 

प्रीती झिंटाला बॉलीवूडची सर्वात धाडसी आणि बेधडक अभिनेत्री म्हणणे चुकीचे ठरणार नाही. एक काळ असा होता की बॉलिवूडमध्ये अंडरवर्ल्डचा हस्तक्षेप होता. चोरी चोरी चुपके चुपके चित्रपटाच्या कागदपत्रांमध्ये हिरे व्यापारी भरत शाह आणि नाझिम रिझवी या चित्रपटाची निर्मिती करत असल्याचे दाखवण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात सर्व पैसा अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलने गुंतवला होता. 

प्रीतीने सांगितले की, तिला अंडरवर्ल्डमधून वसुलीसाठी फोन येत होते. अभिनेत्रीने कोर्टात जाऊन साक्ष दिली. त्या वेळी अंडरवर्ल्डमधून अनेक बड्या व्यक्तींना फोन यायचे, पण डॉनविरुद्ध साक्ष देण्याची हिंमत कोणी दाखवू शकले नाही. प्रिती झिंटाने साक्ष दिली आणि तिच्या साक्षीच्या आधारे निर्माता भरत शाहलाही अटक करण्यात आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सगळ्यात प्रीतीने सुरक्षा घेण्यास नकार दिला. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com