
अवतार – द वे ऑफ वॉटर’ हा जेम्स कॅमेरून दिग्दर्शित चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. 2009 साली आलेल्या अवतारचा हा सिक्वेल आहे. हा चित्रपट जगभरात आपला डंका वाजवत आहेत पण अमेरिकेत मात्र या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोध होतोय इतकंच नाही तर अमेरिकन नागरिक या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी करत आहेत. बॉयकॉटचा हा ट्रेंड अमेरिकेत का चालला आहे चला जाणुन घेऊया.
‘अवतार २’ या चित्रपटात दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी आदिवासी लोकांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्यांचं शोषण वसाहतवादी लोकांनी कसं केल? याची मांडणी केली आहे.पृथ्वीवरची नैसर्गिक संपत्ती कमी होत असल्यामुळे माणसाला आता आस्तित्वासाठी इतर ग्रहांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि मग पॅंडोरासारखा ग्रह वसाहतवाद्यांच्या हाताला लागतो.
आणि मग तिथल्या लोकांचे डिएनए आणि पृथ्वीवरच्या लोकांचे डिएनए एकत्र करुन वैज्ञानिक प्रयोग केले जातात यालाच अवतार प्रोजेक्टअसे नाव दिले जाते. असे या चित्रपटाचे कथानक आहे. थोडक्यात मानव आणि निसर्ग यांचातला संघर्ष चित्रपटात दिसत राहतो.
चित्रपटाचे दिग्दर्शक, जेम्स कॅमेरॉन यांनी चित्रपटासाठी मोठ्या प्रमाणात श्वेतवर्णिय कलाकारांना घेतलं आहे. विविध देशातील्या संस्कृती आणि इतिहास यांचाही अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. दोन्ही चित्रपटात जेम्स कॅमेरून यांनी नेटिव्ह अमेरिकन्स म्हणजेच मूळ अमेरिकेचे रहिवासी यांचा अपमान केला आहे असं मत काही लोकांनी व्यक्त केले आहे.
हेच कारण आहे ज्यामुळे सोशल मीडियावर काही अमेरिकन्स या चित्रपटाला विरोध करत आहेत. ‘अवतार २’वर बहिष्कार घाला असे आवाहन करण्यासाठी, एका ट्विटर युझरने एक ट्वीट केले आहे. ही युझर म्हणते., “अवतार द वे ऑफ वॉटर पाहू नका. इतक्या भयंकर आणि वर्णद्वेषी चित्रपटावर बहिष्कार घालण्यासाठी आत्ताच यूएस रहिवासी आणि जगभरातील इतर स्थानिक समूहांमध्ये सामील व्हा. आपल्या संस्कृतींचा वापर करुन या गोऱ्या लोकांना खूश केले जात आहे. आणखी निळे चेहरे नकोत!”
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.