Filmfare OTT Awards 2022 : 'टब्बर', पंचायत सिजन 2, रॉकेट बॉईजचा दबदबा..

फिल्मफेअर ओटीटी अ‍ॅवॉर्ड जाहीर झाले असुन त्यात टब्बर, टब्बर', पंचायत सिजन 2, रॉकेट बॉईजने बाजी मारली आहे.
Filmfare OTT Awards 2022
Filmfare OTT Awards 2022 Dainik Gomantak
Published on
Updated on

बुधवारी 21 डिसेंबर रोजी मुंबईत पार पडलेल्या फिल्मफेयर ओटीटी अवॉर्ड सोहळ्यात 'रॉकेट बॉयज', 'गुल्लक सीजन 3' आणि 'पंचायत सीजन 2' या गाजलेल्या वेब सिरीजनी वेगवेगळ्या कॅटेगरीत अ‍ॅवॉर्ड मिळवले आहेत.

या पुरस्कार सोहळ्यात अभिषेक बच्चन ला 'दसवीं' या वेब सिरीजसाठी दोन अवॉर्ड्स मिळाले. तर बहुचर्चित 'टब्बर' ला पाच अ‍ॅवॉर्ड्स मिळाले. अनिल कपूर आणि नीना गुप्ता यांना सपोर्टिंग अ‍ॅक्टरच्या कॅटेगरीमध्ये एक- एक अवॉर्ड मिळाला.

'टब्बर'ला बेस्ट क्रिटिक्स, प्रॉडक्शन, अ‍ॅक्टिंग आणि कॉस्च्युम या कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाले वहीं तापसी पन्नूला 'लूप लपेटा' साठी बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा अ‍ॅवॉर्ड मिळाला. साक्षी तंवरला डेब्यू वेब सीरीज 'माई'साठी एक अ‍ॅवॉर्ड मिळाला.

तर बेस्ट अ‍ॅक्टरचा अ‍ॅवॉर्ड अभिषेक बच्चन याला मिळाले. यावर दस्तुरखुद्द बिग'बीं'नी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आपल्या मुलाच्या यशाचं अभिनंदन केलं आहे

या पुरस्कार सोहळ्यात पुढील वेगवेगळ्या कॅटेगरीत पुरस्कार वितरीत करण्यात आले.

बेस्ट क्रिटीक - टब्बर

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - अभय पन्नू ( रॉकेट बॉईज)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्रिटीक - आजितपाल सिंग ( टब्बर)

सर्वोत्कृष्ट अभिनेता - (पुरूष) पवन मल्होत्रा (टब्बर)

सर्वोत्कृष्ट अभिनेता( ड्रामा सिरीज ) - जिम साब (रॉकेट बॉईज)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (ड्रामा सिरीज) - रविना टंडन (अरण्यक)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ड्रामा क्रिटीक (स्त्री) - साक्षी तंवर (मै)

सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरूष): विनोदी - जमील खान (गुल्लक सिझन 3)

सर्वोत्कृष्ट अभिनेता,विनोदी , क्रिटीक (पुरूष) - जितेंद्र कुमार (पंचायत सिझन 2)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सिरीज (स्त्री): विनोदी - गितांजली कुलकर्णी (गुल्लक सिझन 3)

Filmfare OTT Awards 2022
Anil Kapoor- Jackie Shroff : राम-लखन येणार पुन्हा एकत्र..'चोर - पुलिस' मध्ये जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर करणार ही भूमीका

ओटीटी प्लॅटफॉर्म हा नव्या काळातला एक महत्वाचा प्लॅटफॉर्म आहे. लॉकडाऊनच्या काळात ओटीटीवर आलेला प्रेक्षक नंतर तिथेच स्थिरावला. कित्येक कलाकारांना आपला चित्रपट ओटीटी वर रिलीज व्हावा असं वाटतं. नव्या काळातले मनोरंजनाचं बदलणारं स्वरुप आपण ओटीटीच्या माध्यमातुन बघु शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com