Smriti Irani On Sushant : "मी सुशांतला सांगितलं होतं काहीही झालं तरी स्वत:ला कधीही मारू नकोस" स्मृती इराणी असं का म्हणाल्या?

केंद्रिय मंत्री स्मृती इराणी सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत भावुक झाल्याचे पाहायला मिळाले
Smriti Irani On Sushant
Smriti Irani On SushantDainik Gomantak
Published on
Updated on

Smriti Irani On Sushant Sing Rajput: केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांनी एका मुलाखतीत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूची आठवण काढली आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याला या जगाचा निरोप घेऊन अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत, मात्र आजही त्याची आठवण काढत त्याचे प्रियजन भावूक होतात. 

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूने त्याच्या चाहत्यांसोबत स्मृती इराणी यांनाही धक्का बसला होता.. एका युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्याने स्वतः याचा खुलासा केला आहे.

राजकारणात येण्यापूर्वी स्मृती इराणी यांनी एकता कपूरच्या टीव्ही शो 'क्यूंकी सास भी कभी बहू थी'मधून आपल्या करिअरची सुरुवात केली. काही वेळातच स्मृती इराणी यांनी अभिनय जगताला अलविदा करत राजकारणात प्रवेश केला. 

एका इंटरव्ह्यू'मध्ये स्मृती इराणी तिच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे. यासोबतच दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आठवण काढत त्यांनी एक धक्कादायक गोष्ट सांगितली.

दिवंगत अभिनेत्याचे स्मरण करताना स्मृती इराणी भावूक झाल्या. तिने सांगितले की, ज्या दिवशी सुशांतचा मृत्यू झाला, त्या दिवशी त्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये होत्या. 

मात्र त्या ही व्हिडिओ कॉन्फरन्स पूर्ण करू शकल्या नाही. सुशांतने त्यांना फोन का केला नाही याचा त्या विचार करत राहिल्या. त्याने एकदा फोन करायला हवा होता. असंही त्या म्हणाल्या

Smriti Irani On Sushant
Actor Innocent Passes Away: मृत्यूचे भय संपत नाही...आता इंडस्ट्रीतल्या या मल्याळम अभिनेत्याने घेतला जगाला निरोप

स्मृती इराणी यांनी सांगितले की, मी सुशांतला सांगितले होते की काहीही झाले तरी स्वतःला मारू नका. त्यांनी सांगितले की त्या सुशांतला ओळखत होत्या कारण त्यांचे सेट कधीकधी मुंबईत एकाच ठिकाणी असायचे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com