Irshalwadi Landslide : महाराष्ट्रात घडलेल्या त्या दुर्दैवी घटनेतल्या बळींच्या मदतीला गायिका अनुराधा पौडवाल धावल्या...

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात इर्शाळवाडी इथं घडलेल्या भुस्खलानाच्या घटनेनंतर आता अनुराधा पौडवाल मदतीसाठी धावल्या आहेत.
Irshalwadi Landslide
Irshalwadi LandslideDainik Gomantak
Published on
Updated on

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी इथं घडलेल्या भूस्खलन घटनेने संपुर्ण देशभरात खळबळ उडाली होती. या संदर्भात गायिका अनुराधा पौडवाल यांनी व्यक्तिगत पातळीवर मदतीचा महत्वाचा निर्णय घेतलाय. अनुराधा पौडवाल खालापूर इर्शाळवाडी पूरग्रस्त बांधवांना घर बांधुन देणार आहेत. अनुराधा पौडवाल यांनी इर्शाळवाडीसाठी घेतलेला हा मदतीचा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे.

अनुराधा पौडवाल नुकसानग्रस्तांना घरं बांधुन देणार

अनुराधा पौडवाल या स्वतःहून इर्शाळवाडीतील पूरग्रस्त भागाची पाहणी करायला गेल्या होत्या. तेव्हा त्यांनी यावेळी जाहीर केले की, 'माणुसकीच्या नात्याने सर्वांनी सढळ हाताने मदत करा. त्यांना आत्मविश्वास देणे गरजेचे आहे. जी काही थोडीफार मदत तुम्ही करू शकता ती करा. तुमचा मदतीचा हात तुम्ही पुढे करा.' असं आवाहन अनुराधा यांनी केलं आहे.

अनुराधा पौडवाल यांनी सरकारच्या पॉलिसीप्रमाणे जी काही मदत असेल ती करणार असल्याचं जाहीर केलं आहे. याशिवाय त्यांनी घर बांधून देणार असल्याचे सांगितले आहे. अनुराधा यांच्या सर्वोदय फाउंडेशनमार्फत जी काही मदत करता येतील ती त्या करणार असल्याचे त्यांनी सांगीतलं आहे.

मृतदेहांचा शोध सुरुच

इर्शाळवाडीचा दुसरा दिवसही विषण्ण मनस्थितीत उगवला. ४० तासांच्या शोधकार्यानंतर काल सायंकाळपर्यंत सहा मृतदेह बचावपथकाच्या हाती लागले असून, मृतांचा आकडा २२ वर पोहोचला आहे. आतापर्यंत ११० नागरिकांची ओळख पटली आहे. अजूनही ७० ते ८० नागरिकांचा शोध लागलेला नाही.

दरम्यान, राज्यातील दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.

Irshalwadi Landslide
Kajol on Shahrukh : शाहरुखची ही गोष्ट मला अजिबात नाही आवडत ! काजोल असं का म्हणाली?

60 कंटेनर मागवले गेले

दुर्घटनाग्रस्त भागातील नागरिकांच्या तात्पुरत्या निवास व्यवस्थेसाठी ६० कंटेनर मागविण्यात आले आहेत. ‘सिडको’च्या माध्यमातून या नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ‘‘ स्थानिक माहितीवरून या आदिवासी वाडीमध्ये एकूण ४८ कुटुंबे वास्तव्यास असून लोकसंख्या २२८ इतकी आहे. त्यातील सुमारे १७ ते १८ घरांवर दरड कोसळली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com