Kajol on Shahrukh : शाहरुखची ही गोष्ट मला अजिबात नाही आवडत ! काजोल असं का म्हणाली?

अभिनेत्री काजोल शाहरुखच्या एका सवयीबद्दल बोलताना म्हणाली....
Kajol on Shahrukh
Kajol on ShahrukhDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

शाहरुख आणि काजोलची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या सगळ्यात लाडक्या जोडींपैकी एक आहे.  दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आणि प्रत्येक चित्रपटातील त्यांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांची मने जिंकली. यापैकी एक चित्रपट म्हणजे 'करण अर्जुन' (1995). अलीकडेच काजोलने या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेला एक किस्सा शेअर केला आहे, जेव्हा शाहरुख खानमुळे ती एकदम शांतच झाली होती....

करण अर्जुनमधलं गाणं

आजकाल तिची वेब सीरीज 'द ट्रायल' मुळे चर्चेत असलेल्या काजोलने एका मीडियाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान शाहरुख खानशी संबंधित एक जुना किस्सा शेअर केला, जो 'करण अर्जुन'शी संबंधित आहे. काजोलने सांगितले की, राकेश रोशन दिग्दर्शित या चित्रपटासाठी 'जाती हूं मैं' गाणे शूट केले जात होते. यादरम्यान काजोल तिच्या हसण्यावर नियंत्रणच ठेवू शकत नव्हती, त्यानंतर शाहरुख खानने संपूर्ण गाण्याच्या शूटिंगची प्रोसेस पुढे नेली. 

काजोल म्हणाली शाहरुख...

काजोल म्हणाली, 'आम्ही खूप हसलो. शाहरुख आणि मी दोघेही खूप हसत होतो. पण, गाण्याच्या शूटिंगदरम्यान शाहरुख मला प्रोत्साहन देत होता आणि म्हणत होता, 'प्लीज हे गाणं पूर्ण कर.' काजोल पुढे म्हणाली की गाण्यातील नृत्याचा भाग सोपा होता. पण, हसण्यावर नियंत्रण ठेवणं खरंच कठीण होतं. तेव्हा शाहरुख मला म्हणाला, 'चुप! गाणे शूट करा आणि ते पूर्ण कर प्लीज'! काजोल पुढे म्हणाली की, शाहरुखने नेहमीच अशी साथ दिली आहे.

Kajol on Shahrukh
Prabhas - Kriti Affair : प्रभास आणि क्रितीच्या प्रेमाच्या चर्चा का होतायत? लग्नाचा प्रश्न येताच प्रभास खुलला..

शाहरुखची ही सवय

काजोलने शाहरुख खानचे खुलेपणाने कौतुक केले, पण त्याच्या एका सवयीचाही उल्लेख केला जी तिला अजिबात आवडत नाही. काजोलने सांगितले की, शाहरुख त्याच्या व्यक्तिरेखेचे ​​डायलॉग्ज पूर्णपणे लक्षात ठेवून सेटवर येतो, तसेच तो इतर स्टार्सचे संवादही पाठ करुन येतो. त्याला स्वत:चे, इतरांचे तसेच तिसऱ्या व्यक्तीचे संवादही आठवतात.

याआधीही काजोलने शाहरुख खानसोबत काम करण्याचा अनुभव अनेकदा शेअर केला आहे. काजोल म्हणाली होती की तो एकमेव अभिनेता आहे जो आपल्या महिला सहकलाकारांना सेटवर आरामदायी वातावरण देतो .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

India Slams Pakistan UN General Assembly
AI Wildlife protection System India
Shivaji Maharaj Statue Goa High Court Case
IRGC Claims Capturing US Underwater Drone
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com