Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरने पुण्यात असा साजरा केला व्हॅलेंटाईन्स डे

बॉलिवूडची क्यूट अॅक्ट्रेस श्रद्धा कपूरने पुण्यात आपला व्हॅलेंटाईन्स डे साजरा केला आहे.
Shraddha Kapoor in Pune
Shraddha Kapoor in PuneDainik Gomantak
Published on
Updated on

Shraddha Kapoor in Pune: श्रद्धा कपूर बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्रींनपैकी एक असून, तिचा चाहतावर्ग मोठा आहे यात शंका नाही. अलीकडेच, श्रद्धाचा आगामी चित्रपट 'तू झूठी मैं मक्कार'चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, याची चर्चा सर्वत्र रंगत आहे.

या सिनेमाच्या प्रमोशनसाठी श्रद्धाने पुणेकरांना भेट दिली. अशातच, व्हॅलेंटाइन डेच्या खास प्रसंगी पुण्यातील एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना गुलाब देत श्रद्धाने हा खास दिवस सेलिब्रेट केला. असे म्हणणे योग्य ठरेल की, श्रद्धाने आपल्या चाहत्यांसोबत नेहमीच आनंद शेअर केला आहे.

या पुणे दौऱ्या दरम्यान, श्रद्धा कपूरने सेवेन वंडर्स येथेदेखील भेट दिली. तसेच, येथील प्रसिद्ध आयफेल टॉवरखाली अभिनेत्रीने वडापावचा आस्वाद घेतला. इतकेच नव्हे तर, श्रद्धाने पुण्यातील प्रसिद्ध काटाकिर्र मिसळचा आनंद घेऊन आपला दौरा पूर्ण केला.

आता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या आगामी 'तू झूठी मैं मक्कार'या चित्रपटाच्या रिलीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा अतरंगी नावाचा चित्रपट एक वेगळी गोष्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे नक्की

Shraddha Kapoor In Pune trying Misal PAv
Shraddha Kapoor In Pune trying Misal PAvDainik Gomantak
Shraddha Kapoor in Pune
Pathan Box Office Collection: पठाण ठरला भारतातला सर्वात मोठा ओपनर...पहिल्या दिवशीच तोडला या चित्रपटाचा रेकॉर्ड...

लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित 'तू झूठी मैं मक्कार'या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. तसेच, टी-सिरीजचे गुलशन कुमार आणि भूषण कुमारद्वारा प्रस्तुत हा चित्रपट, 8 मार्च 2023 रोजी होळीच्या दिवशी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com